इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड दिग्दर्शक, निर्माते, विनोदी अभिनेता आणि पटकथा लेखक सतीश कौशिक यांचे गुरुवार, ९ मार्च रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. सतीश यांच्या विनोदी भूमिकांवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. पण, आपल्या चाहत्यांना पोट धरून हसवणाऱ्या सतीश यांचे खासगी आयुष्य संमिश्र होते. त्यांनी अनेक चढउतार अनुभवले. सतीश यांचा मुलगा अवघा दोन वर्षांचा असताना, त्याचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरायला त्यांना बराच काळ जावा लागला. यानंतर वयाच्या ५६ व्या वर्षी सतीश सरोगसीच्या साहाय्याने दुसऱ्यांदा बाबा झाले.
चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश यांच्या मुलाचं वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झालं. मुलाच्या निधनामुळे कौशिक यांना मोठा धक्का बसला. सतीश कौशिक यांनी १९८५ मध्ये शशी कौशिक यांच्याशी विवाह केला.
लग्नानंतर नऊ वर्षांनी त्यांना हा मुलगा झाला. मात्र, दोनच वर्षात त्याचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या मोठ्या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरलं. त्यानंतर १६ वर्षांनी २०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांना मुलगी झाली. वयाच्या ५६व्या वर्षी ते पुन्हा वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असून ती ११ वर्षांची आहे.
सतीश कौशिक हे मूळचे हरयाणाचे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यासारख्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तसेच त्यांनी ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Actor Satish Kaushik Life Family Journey