इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वागण्याने देखील ओळखले जातात. कलाकार म्हणून असलेला एक ताठा त्यांच्यापासून लांब असतो. म्हणूनच ते खरेखुरे कलाकार म्हणून ओळखले जातात. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे विक्रमादित्य अभिनेता प्रशांत दामले यांची एक पोस्ट. या पोस्टद्वारे त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. आणि या व्हिडिओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय आहे पोस्टमध्ये?
काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण याल बरं वाटेनास झालं. साधारणपणे प्रयोग १२.३० ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे दोनच्या सुमारास मुंबईकडं निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळंच थांबलं. पण थांबेल तो संक्या कसला. त्यानं चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडं हेवीचा पण लायसन्स आहे हे कालच मला कळलं. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर. नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीडने चालू आहेत”.
चाहत्यांनी केले कौतुक
संकर्षण कऱ्हाडेचा बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. शाब्बास पठ्ठ्या, ज्याच्याबद्दल वाटते सर्वांना आकर्षण.. असा आहे सर्वांचाच लाडका संकर्षण, माणसात देव असतो म्हणतात त्याची प्रचिती, दामले मास्तरांच्या तालमीत तयार झालेला हरहुन्नरी कलाकार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=211390978499407
Actor Sankarshan Karhade Bus Driving Video