इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु त्याचे आयुष्य देखील नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. त्याला इंडस्ट्रीत ‘संजू बाबा’ म्हणून ओळखले जाते. संजय दत्त त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. संजय दत्त आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या रिलेशनविषयी अनेकदा भरपूर चर्चा झाली. त्यांच्या ब्रेकअप विषयी एक महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
संजय दत्तच्या कारकिर्दीसोबतच त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपटात या गोष्टी पाहायला मिळल्या. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून हे देखील समोर आले आहे की, त्याच्या आतापर्यंत 308 गर्लफ्रेंड झाल्या आहेत. त्याच्या गर्लफ्रेंडच्या यादीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचाही समावेश होता. विशेष म्हणजे त्याच्या रिलेशन मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचे नावही समोर आले आहे. इंडस्ट्रीतही या दोघांच्या चर्चांना उधाण आले आहे. ९० च्या दशकात अनेकदा संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची नावे एकत्र घेतली जायची. त्यावेळी संजय दत्तही ऋचा शर्मासोबत वैवाहिक जीवन व्यतीत करत होता. त्यामुळे दोघांनी या नात्याला अफवा असे नाव दिले. मात्र त्याचवेळी ‘साजन’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दोघांची नावे सर्वत्र चर्चेत येऊ लागली.
संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माने एका मुलाखतीत संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या विशेष नात्याबद्दल तसेच रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. ऋचा शर्माने एक मुलाखत देताना सांगितले की, त्यावेळी ती कॅन्सरशी झुंज देत होती. यादरम्यान संजय तिला म्हणाला होता की, जेव्हा माधुरी दीक्षित आणि मी (म्हणजे संजय दत्त) वेगळे झाले तेव्हा तो खूपच दुःखी होऊन आतुन तुटला होता.
यावेळी ऋचा म्हणाली होती की, प्रत्येक माणसाला आयुष्यात कोणाची तरी भावनिक गरज असते. तसेच संजय दत्त हा तेव्हा माधुरी दीक्षितवर अवलंबून होता. त्यानंतर जेव्हा माधुरी त्याला सोडून गेली तेव्हा तो खूप निराश झाला. खरे म्हणजे माधुरी दीक्षित व संजय दत्त अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यात ‘साजन’, ‘खतरों के खिलाडी’, ‘खलनायक’, ‘इलाका’, ‘ठाणादार’ या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांमध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे परंतु त्याचवेळी, १९९३ मध्ये संजय दत्तने एक मुलाखत दिली होती त्यात त्याने माधुरीसोबतचे नाते पूर्णपणे चुकीचे व अफवा असल्याचे सांगितले होते.