मुंबई – बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. वेगवेगळ्या कलाकारांचे हे चित्रपट वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. मात्र अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपट उद्योगातील एकमेव कलाकार असून तो एका वर्षात जास्तीत जास्त चित्रपट प्रदर्शित करतो. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खानने आपल्या कारकिर्दीत 100 कोटीचे जास्तीत जास्त
चित्रपट दिले आहेत. पण, सलमानचे असे अनेक चित्रपट आहेत जे आजपर्यंत प्रदर्शित झालेले नाहीत. त्या अप्रदर्शित चित्रपट बद्दल जाणून घेऊ या…
बुलंद
अभिनेत्री सोमी अलीला डेट करत असताना सलमान खान बुलंद चित्रपटाचे शूटिंग करत होता. यामध्ये सोमी सलमानच्या सोबत दिसणार होती. मात्र, चित्रपटाचे अर्धे शूटिंग पूर्ण झाल्यावर ते अचानक रद्द करण्यात आले.
दिल है तुम्हारा
राजकुमार संतोषी या चित्रपटाची निर्मिती करत होते. पण, पहिल्या सत्रानंतर चित्रपटाला स्थगिती मिळाली. यात सलमान बरोबरच सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री देखील दिसणार होते.
राम
सोहेल खानच्या दिग्दर्शनाखाली सलमान सह बनवल्या जात असलेल्या, या चित्रपटाच्या जास्त बजेटमुळे, अर्ध्या शूटिंगनंतरही ते थांबवले गेले.
चोरी मेरा काम
सलमान खानचा हा चित्रपटही प्रदर्शित होण्यापुर्वी डब्ब्यामध्ये गेला. या चित्रपटात सनील शेट्टी देखील सलमान खानसोबत पडद्यावर दिसणार होता.
दस
निर्माता मुकुल एस. आनंद यांच्या निधनामुळे हा चित्रपट मध्यंतरी थांबवण्यात आला होता. सलमान सह हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता.
सौतेले
चित्रपटात सलमान खान आणि ऋषी कपूर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले होते, पण अन्य काही चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही प्रदर्शनापूर्वी डब्ब्यामध्ये गेला.
इंशा-अल्लाह
काही दृश्यातील फरकांमुळे संजय लीला भन्साळींचा चित्रपट थांबवण्यात आला. आलिया भट्ट या चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार होती.
राजू राजा राम
बीग बजेटमुळे हा चित्रपटही रद्द झाला. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ आणि गोविंदा दिसणार होते.
आंख मिचैली
सलमान खानचा सुपरहिट चित्रपट जुडवा नंतर हा चित्रपट लवकरच रिलीज होणार होता. पण, जुडवा चित्रपटानंतर सलमानला दुहेरी भूमिका करायची नव्हती, त्यामुळे तो रद्द करण्यात आला.
नो एन्ट्री मे एन्ट्री
सलमान खानचा हा चित्रपट बोनी कपूरसोबतच्या त्यावेळीच्या वाईट संबंधांमुळे कधीही रिलीज झाला नाही. या चित्रपटात अनेक कलाकार एकत्र दिसणार होते.