मुंबई, (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या विषयी नेहमीच चर्चा सुरू असते. काही अभिनेत्यांची अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले जाते. त्यातच अविवाहित अभिनेत्यांच्या बाबतीत तर अशी चर्चा नेहमीच रंगतात. त्यात सगळ्यात आघाडीवर असलेला अभिनेता म्हणजेच सलमान खान होय.
बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले असून सलमान खानचे लव्ह लाईफ फारसे चांगले राहिले नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र आता पुन्हा एकदा सलमानचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. हॉलिवूड अभिनेत्री समंथा लॉकवुडसोबत सलमान खानच्या रिलेशन बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, आता समांथानेही या वृत्तांवर आपली बाजू मांडली असून संपूर्ण सत्य सांगितले आहे.
सामंथा लॉकवुड हिने काही काळापूर्वी हृतिक रोशनसोबतचा एक फोटो शेअर केला होता, तर त्यानंतर ती सलमान खानच्या वाढदिवसाला पनवेल फार्म हाऊसवरही दिसली होती. अशा परिस्थितीत त्याचे नाव सलमान खानशी जोडले जाऊ लागले आणि सोशल मीडियावर असे म्हटले जात होते की, सलमान खान आणि समंथा लॉकवुड एकमेकांना डेट करत आहेत. या अफवांवर सामंथा लॉकवुडने बॉलीवूड हंगामासोबतच्या संभाषणात सांगितले की, ‘मला वाटते काही जण खूप बोलतात. तर थोडे जण काहीही न बोलता खूप बोलू शकतात. मी सलमानला भेटले असून तो खूप छान माणूस आहे, त्याच्याबद्दल मी एवढेच सांगू शकते, त्यामुळे हे सर्व कुठून बोलत आहेत हे मला माहित नाही.
सामंथा लॉकवुड पुढे म्हणाली की अनेकांना वाटते मी फक्त त्यालाच भेटले, मी हृतिकलाही भेटले, पण कोणीही आमच्याबद्दल काहीच बोलले नाही. या अफवा कुठून आल्या हे मला माहीत नाही. पण ते निराधार आहेत. यासोबतच सामंथा लॉकवूडने सांगितले की, सलमानचा सुलतान चित्रपट हा माझा आवडता बॉलिवूड चित्रपट आहे.
पनवेलमधील सलमान खानच्या फार्महाऊसच्या बर्थडे पार्टीला सामंथा लॉकवूडही उपस्थित होती, यावर ती म्हणाली, ‘माझ्यासाठी सगळेच अनोळखी होते, कारण मी कोणालाच नीट ओळखत नाही. मी फक्त सलमानला ओळखते, मी त्याला आधी मी भेटले होते, जेव्हा मी पार्टीमध्ये इतरांना भेटायला सुरुवात केली, तेव्हा मला माहित होते की, कोणीतरी अभिनेता, अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक आदी मला ओळखतील, या पार्टीचा चांगला अनुभव आला, असेही ती म्हणाली.