इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्रासह बॉलीवूडला ‘वेड’ लावणारे अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट संबंध महाराष्ट्रात तुफान गाजला. या दोघांकडे चित्रपटसृष्टीमधील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांमधील खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री देखील कमाल आहे. या बहुचर्चित जोडीच्या लग्नाला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दोघंही सध्या एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहेत. यादरम्यान रितेश आणि जेनिलिया यांच्यात घडलेल्या एका किश्श्याने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
रितेश आणि जेनिलिया लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ट्रेकिंगला गेले आहेत. लग्नाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने एक रिल इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहे. तसे तर रितेश – जेनिलिया हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी ते चाहत्यांना शेअर करत असतात. कायम ते दोघे सोशल मीडियावर काहीतरी रील बनवून शेअर करत असतात. या व्हिडीओमध्ये जेनेलिया आणि रितेशचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतो आहे.
नेहमीप्रमाणेच त्यांच्या या रिल व्हिडीओला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या रिलमध्ये जेनेलिया म्हणते की, “तुझ्यासाठी मी संपूर्ण जगाबरोबर भांडू शकते.” यावर रितेश म्हणतो, “संपूर्ण दिवस तर तू माझ्यासोबतच भांडत असतेस.” त्यानंतर जेनेलिया तात्काळ “मग तूच तर माझं जग आहेस”, असं सांगते. जेनिलियाचं हे उत्तर ऐकून रितेश चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात.
त्यांच्या या मजेशीर व्हिडीओला तासाभरातच एक लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक रिल तर झालंच पाहिजे” असं जेनेलियाने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. चाहते रितेश आणि जेनेलियाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
Actor Ritesh Deshmukh and Actress Genelia Video