इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात काही जोड्या या अगदी आदर्श वाटाव्यात अशा आहेत. रितेश देशमुख – जेनिलिया देशमुख त्यातीलच एक जोडी. ही जोडी मराठीसोबतच हिंदीतही लोकप्रिय आहे. नुकताच या जोडीचा ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जो चांगलाच लोकप्रिय झाला. नुकताच रितेश देशमुखने जेनिलियाला नमस्कार केला. त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बॉलीवूडमध्ये कायमच चर्चेत असणारे कपल म्हणून रितेश आणि जेनिलीयाकडे पाहिले जाते. रितेश आणि जेनिलीया यांच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. त्यांच्यातील प्रेम अद्याप कायम आहे. नुकतंच एका कार्यक्रमात रितेश जिनिलीयाच्या पाया पडला आणि त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
झी मराठीने त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत रितेश त्याच्या सुखी संसाराचे गुपित सांगतो आहे. यावेळी श्रेयस तळपदे आणि रितेशची ऑनस्क्रीन सुरु असलेली मजा मस्तीही दिसते. या व्हिडीओच्या सुरुवातीला श्रेयस तळपदे हा रितेशला तुझ्या “सुखी संसाराचे रहस्य काय?” असा प्रश्न विचारतो. त्यावर रितेश, पुरुषाने चूक आपलीच आहे, हे लवकर कबूल केलं पाहिजे, असे म्हणतो. रितेशचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित अभिनेत्री अलका कुबल या हसताना दिसतात.
रितेश आणि जेनिलीया नुकतेच ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. यात रितेशचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रितेश भर पुरस्कार सोहळ्यात जेनिलियाच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. यानंतर तिथे उपस्थित सर्वजण ‘वेड’ चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. ‘रितेश देशमुख हे त्यांच्या पत्नीला घाबरतात’, असे श्रेयस यावेळी म्हणतो. त्यावरही सर्वजण खळखळून हसत आहेत.
सुखी संसाराचं रहस्य..
चर्चा रंगणार बातमी गाजणार.झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा
26 मार्च, रविवार, संध्या. 7 वा. #ZeeChitraGaurav #ZGP #ZeeMarathi#ZeeChitraGaurav2023 pic.twitter.com/tDKRvPkucN— Zee Marathi (@zeemarathi) March 17, 2023
दरम्यान, रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदा त्यांच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.
कोण येणार आणि कोण नेणार?
चर्चा रंगणार बातमी गाजणार.झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा
26 मार्च, रविवार, संध्या. 7 वा. #ZeeChitraGaurav #ZGP #ZeeMarathi pic.twitter.com/mmonKDntde— Zee Marathi (@zeemarathi) March 17, 2023
Actor Reitesh Deshmukh Actress Genelia Disuza Video