इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – न्यूड फोटोशूट प्रकरणी नुकताच नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यानंतर पोलीस ठाण्यात हजेरी लावलेला अभिनेता रणवीर सिंग पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. फॅब्युलस लाइव्ज ऑफ बॉलिवूड वाइव्ज’ या वेब सीरिजचा दुसरा सिझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यामध्ये चंकी पांडेची पत्नी भावना पांडे, संजय कपूरची पत्नी महीप कपूर, समीर सोनीची पत्नी नीलम कोठारी आणि सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा किरण सजदेह यांनी सहभाग घेतला आहे. सेलिब्रिटींच्या या पत्नींनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी यात बरेच खुलासेदेखील केले आहेत. यातील एक एपिसोड सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. या एपिसोडमुळे अभिनेता रणवीर सिंगला ट्रोल करण्यात येत आहे.
रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या सेटवर या चौघींनी त्याची भेट घेतली. या भेटीदरम्यान रणवीर अचानक त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं दाखवत महीपच्या मांडीवर पाय ठेवतो. यावेळी नेमकं काय करावं हे महीपला सुचत नाही आणि इतर तिघी जणी हसू लागतात. हा एपिसोड आणि रणवीरचं वागणं नेटकऱ्यांना आवडलं नाही. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत अनेकांनी त्याच्यावर टीका केली.
रणवीरने मर्यादा ओलांडल्या, असं काहींनी म्हटलंय. ‘हे सर्व ठरवून केलंय हे माहिती आहे. पण तरी यामुळे रणवीरविषयीचं मत बदलत नाही. जेव्हा तो खरंच करण जोहरपासून अंतर ठेवेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल’, असे एका युझरने म्हटले आहे. तर “ही अशीच लोकं आहेत, यांच्यामुळे बॉलिवूडचा अनादर होतो. रणवीरला या एपिसोडमध्ये पाहून खरंच चीड येते”, असं दुसऱ्या युजरने म्हटले आहे. ‘रणवीरचं हे वागणं दीपिकासाठी खूपच लज्जास्पद असेल. रणबीर कपूरने असं कधीच केलं नसतं,’ अशीही तुलना एका नेटकऱ्याने केली. ‘फॅब्युलस लाइव्ज ऑफ बॉलिवूड वाइव्ज’ या सीरिजची निर्मिती करण जोहरने केली आहे. पहिला सीझन गाजल्यानंतर या सीरिजचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Actor Ranveer Singh Again Troll in Social Media
Entertainment Bollywood