मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बालपणापासून ते वृद्धांवस्थेपर्यंत आयुष्याचे वेगवेगळे टप्पे असतात, त्यात बालपणानंतर येणारे किशोरवय, कुमारवय आणि युवक वयाचा हा महत्वाचा मानला जातो. या कालावधीतील ‘सोळाव वरीस’ (वय वर्ष १६) हे अत्यंत वेगळे आणि महत्त्वाचे मानले जाते. इतकेच नव्हे तर ‘सोळा वरीस धोक्याचं’ असेही म्हटले जाते. विशेषतः तरुणीसाठी वयाचे सोळावे वर्ष अधिक महत्वपूर्ण मानले जाते.
अनेक तरूणी हिंदी चित्रपट सृष्टीत म्हणजेच बॉलिवूडमध्ये १६ व्या वर्षी पदार्पण करतात किंवा त्या आपले भवित्यव्य आजमावतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. त्याच बरोबर अनेक प्रसिद्ध अभिनेते त्यांनी त्यांच्या वयापेक्षा खूपच कमी वयाच्या अभिनेत्रीशी लग्न केले आहे. अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्यापासून ते अलीकडे अनेक कलाकारांपर्यंतचा हा सिलसिला सुरु आहे. इतकेच नव्हे तर लग्नबंधनात अडकला नंतर काही कलाकारांनी घटस्फोट देखील घेतले आहे त्यामुळे बॉलिवूडमधील या वेगळ्या नातेसंबंधांची नेहमी चर्चा होत असते.
एकेकाळचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचे लग्न आजही चर्चेत असते. अंजू महेंद्रूपासून वेगळे झाल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यात जवळीक वाढली. तसेच डिंपल कपाडियाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा ती अवघ्या १६ वर्षांची होती. ऋषी कपूरसोबत बॉबी हा तिचा पहिला चित्रपट होता.
डिंपल ही राजेश खन्ना (तेव्हा वय ३१) यांच्या प्रेमात पडली आणि तिने तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश यांच्याशी लग्न केले. मात्र, काही काळानंतर त्यांचे वैवाहिक जीवन अडचणीत आले. याचे कारण म्हणजे डिंपलने चित्रपटात काम करत राहावे, असे राजेशला पसंत नव्हते. त्यानंतर राजेश खन्ना यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर डिंपल कपाडिया आणि सनी देओलच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या.
विशेष म्हणजे, एकीकडे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते, तर दुसरीकडे सनी देओलला आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. सनीच्या या निर्णयामुळे डिंपल खूपच निराश झाल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी, आपल्या वैवाहिक जीवनात नाराज असूनही तिने पती राजेश खन्ना यांना घटस्फोटही दिला नाही.
डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांनी ‘अर्जुन’, ‘मंझिल-मंझिल’, ‘आग का गोल’, ‘गुनाह’ आणि ‘नरसिंहा’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमध्ये काम करताना दोघेही प्रेमात असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितले नाही. डिंपल सनीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती सनीची एक्स गर्लफ्रेंड अमृता सिंगने केली होती.
अमृताने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, डिंपल कपाडियाने तिला सांगितले होते की तिच्याकडे गमावण्यासारखे काही नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला हवा असलेला मित्र सापडला. त्यादरम्यान अशीही अफवा पसरली होती की, डिंपल कपाडिया आणि सनी खूप जवळ आहे. डिंपलच्या मुली ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनीला ‘छोटे पापा’ म्हणायचे, असेही म्हटले जाते.








