इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रभास आणि क्रिती ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटादरम्यान त्यांच्यात प्रेम फुलल्याची चर्चा आहे. ही चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रभासने सोशल मिडीयावर केलेले क्रितीच कौतुक. अभिनेता वरुण धवनची इंडस्ट्रीत १० वर्षे पूर्ण झाली. याच दिवसाचं खास निमित्त साधत वरुणच्या बहुप्रतिक्षित ‘भेडिया’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटात वरुण एका भितीदायक रूपात प्रेक्षकांच्या रुपात समोर येणार आहे. तो एका इच्छाधारी लांडग्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन देखील दिसणार आहे. केवळ वरुणच नाही तर, या चित्रपटातील क्रितीच्या लूकचेही खूप कौतुक होत आहे. आता ‘बाहुबली’ स्टार प्रभासने देखील सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक केले आहे. प्रभास आणि क्रिती ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. आता प्रभासने ‘भेडिया’च्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. तर, क्रितीनेही त्यावर छानसा रिप्लाय दिला आहे.
वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर ‘भेडिया’ या चित्रपटाचा ट्रेलर लोकांच्या फारच पसंतीस उतरला आहे. तर, कलाकार मंडळीही या ट्रेलरचे कौतुक करत आहेत. ‘बाहुबली’फेम प्रभासने देखील त्याच्या इन्स्टा स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कौतुक केले आहे. प्रभास म्हणतो, ‘ट्रेलर खूपच छान झाला आहे. संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.’ यात त्याने क्रिती आणि वरुण धवन यांना टॅग केले आहे. त्यावर क्रिती सेननही अभिनेत्याला रिप्लाय दिला आहे. यावर कमेंट करताना क्रितीने लिहिले की, ‘प्रभास तू खूप क्यूट आहेस… धन्यवाद.’ यासोबतच क्रितीने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. क्रिती सेननच्या या उत्तराने सोशल मीडिया युझर्सच्या आणि चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. क्रितीच्या या उत्तराने चाहते देखील खूश झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’चे शूट संपल्यानंतरही दोघांमधील नाते अजूनही घट्ट आहेत. दोघेही एकमेकांना सतत कॉल किंवा मेसेज करत असतात. दोघेही एकमेकांना पूर्ण वेळ देताना दिसतात. जेव्हा दोन सेलिब्रिटी चित्रपटात एकत्र काम करतात, तेव्हा त्यांच्या लिंक-अपच्या बातम्या नेहमीच समोर येतात. पण क्रिती आणि प्रभास याबाबतीत वेगळे आहेत. दोघेही एकमेकांबद्द्ल खूप सिरिअस आहेत.
Actor Prabhas Dating With This Actress Social Media
Entertainment Kirti Sanon Adipurush