विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना साथीच्या आजारांमुळे अद्यापही देशभरात अनेक उद्योग-व्यवसाय बंद असून याचा फटका मनोरंजन क्षेत्राला ही बसला आहे. त्यातच अनेक टीव्ही मालिकांचे चित्रीकरण आणि प्रक्षेपण बंद झाल्याने या क्षेत्रातील कलाकारांसह अन्य लोकांवर ही बेरोजगारीची पर्यायाने उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना संसर्गामुळे सर्वात जास्त नुकसान झालेला एक उद्योग म्हणजे मनोरंजन उद्योग होय. विशेषत: टीव्ही उद्योगावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. सिरियलचे शूटिंग बंद झाल्यामुळे अनेक कलाकार रस्त्यावर आले असून अनेकांना जगण्यासाठी तडजोडीदेखील करावी लागत आहेत. अशीच व्यथा टीव्हीच्या मालिकेत ‘हनुमान’ ची भूमिका करणाऱ्या निर्भय वाधवा याची आहे. निर्भय हा अनेक पौराणिक मालिकांमध्ये हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो.









