इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सिनेविश्वातील तारे – तारका नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. यातही अनेकदा वाईट कारणांचा भरणा जास्त असतो. सध्या असाच एक गुणी अभिनेता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा अत्यंत ताकदीचा नट आहे. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे तो सध्या चर्चेत आहे.
छोट्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिंमतीवर आपलं स्थान निर्माण केलं आहे. केवळ चित्रपटच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही त्याची चर्चा आहे. कोणतीही भूमिका असो, नवाजुद्दीन ती जबरदस्त ताकदीने साकारतो. यामुळेच प्रेक्षकांच्या मनात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. कोणत्या परिस्थितीतून त्याने आजचे हे स्थान निर्माण केले आहे, याची कल्पना त्याच्या चाहत्यांना आहे.
नवाज वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. नवाजच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यावर नवाजच्या पत्नीने अभिनेत्यावर आरोप केले. आणि या दोघींच्या भांडणात नवाजवर घर सोडून बाहेर राहण्याची वेळ आली होती. लॉकडाउनच्या दरम्यान या दोघांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समजले होते. पण त्यावर नवाज किंवा त्याची पत्नी आलिया या दोघांनीही काहीच भाष्य केले नव्हते. आता नवाजच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात एफआयआर नोंदवल्याने पुन्हा त्यांच्या या कौटुंबिक कलहाची गोष्ट समोर आली आहे.
नवाजची पत्नी आलिया हिनेसुद्धा सोशल मिडियावर एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करत नवाजवर आरोप केले आहेत. आलियाला नवाजने कशाप्रकारे छळलं, हे या व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून सांगण्याचा आलियाचा प्रयत्न आहे. आता नवाज त्याच्या मुलांनाही या वादात खेचत असल्याचे आलियाचे म्हणणे आहे. पहिल्या मुलाच्या जन्मानंतरच या दोघांमध्ये बेबनाव व्हायला सुरुवात झाली होती. आता एका प्रॉपर्टीवरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला असून तो विकोपाला गेला असल्याची चर्चा आहे.
आलिया नवाजुद्दीनच्या बंगल्यात गेल्यावर तिथे तिचा नवाजुद्दीनच्या आईबरोबर वाद झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी बोलावले होते. नवाजच्या आईच्या तक्रारीच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आलियाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिच्याविरुद्ध भादंवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
#BreakingNews | Actor #NawazuddinSiddiqui's wife Aaliya Siddiqui approaches HC to expedite proceeding on domestic violence case. She is to approach family court as well requesting a paternity test to prove son’s legitimacy
Join the broadcast with @Arunima24 | @kotakyesha pic.twitter.com/g8aYnLYWM7
— News18 (@CNNnews18) February 11, 2023
तर दुसरीकडे आलियाने देखील आपल्या सासरच्यांवर आरोप केले आहेत. आलियाच्या वकिलाचे म्हणणे आहे की, “नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी आलियाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मग तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिला अटक करण्याची धमकी दिली.” यापुढेही आलियाचे वकील म्हणतात की, “नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबीयांनी आलियाला आठवडाभर जेवण दिलेले नाही. झोपायला बेड, अंघोळीसाठी बाथरूम वापरू दिले नव्हते. आलियाच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आला होता. खोलीबाहेर २४ तास बॉडीगार्ड तैनात होते.” असे आरोप आलियाच्या वकिलांनी केल्यानंतर हे प्रकरण आणखीन चिघळलं.
या सगळ्यावर कडी म्हणजे नवाजने त्याच्या सर्वात लहान मुलाला स्वीकारण्यासही नकार दिल्याचे कळते आहे. त्यामुळे आता आलियाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून डीएनए टेस्टची मागणी केली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आलिया म्हणाली, “हा माणूस अजिबात महान नाही. याने कायम त्याची आधीची पत्नी आणि एक्स गर्लफ्रेंडसह माझा बऱ्याचदा अपमान केला आहे. आता तो आमच्या मुलांना देखील यात आणू पाहतो आहे. हा माणूस इतका वाईट कसा वागू शकतो?, असा सवाल आलियाने केला आहे. माझ्याकडे असलेला प्रत्येक पुरावा हे सिद्ध करतो की या माणसाने माझा पत्नी म्हणून स्वीकार केला होता. स्टारडम मिळाल्यावर तो अधिकच खोटारडा झाला आहे, ही गोष्ट मला आधी माहीत असती तर मी कधीच या माणसाशी लग्न केलं नसतं.”
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे लग्न २००९ मध्ये झाले. या दोघांना शोरा नावाची मुलगी आणि यानी नावाचा एक मुलगा आहे. याच लहान मुलाच्या डीएनए टेस्टसाठी आलियाच्या वकिलांनी उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. आता या प्रकरणात निर्णय कोणाच्या बाजूने लागणार ते येणारा काळच सांगेल.
Nawazuddin Siddiqui की पत्नी Aliya Siddiqui ने Instagram पर video के जरिए लगाई न्याय की गुहार#NawazuddinSiddiqui #AliyaSiddiqui #mumbaipolice pic.twitter.com/w5yzxzyx17
— Ewoke.TV (@EwokeT) February 2, 2023
Nawazuddin Siddiqui and wife aliya dispute