इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सेलिब्रिटी मग ते हिंदीतले असोत की मराठीतले त्यांची घरे, प्रॉपर्टी, फार्म हाऊसेस नेहमीच चर्चेत असतात. या फार्म हाऊसेसवर होणाऱ्या पार्ट्या म्हणजे तर नेहमीच चर्चेत राहणारा विषय. अशीच एका पार्टीची चर्चा सध्या रंगते आहे. ही पार्टी आणि त्यानिमित्ताने एक मैत्रीची गोष्ट सध्या सगळ्यांच्याच तोंडी आहे.
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, नीना कुळकर्णी आणि भारती आचरकेर यांनी नाना यांच्या फार्महाऊसवर एकत्र वेळ घालवत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुण्याच्या जवळ निसर्गाच्या सानिध्यात नानांनी एक फार्महाऊस बांधलं आहे. मुंबईत नसतात तेव्हा ते तिथं असतात. चाहत्यांना जितकं त्यांच्या या फार्महाऊसबद्दल कुतूहल वाटतं, तितकंच त्यांच्या सेलिब्रिटी मित्र-मैत्रिणींनाही. अनेक सेलिब्रिटी नानांच्या फार्महाऊला भेट देत असतात.
नीना यांनी नुकतीच नाना यांच्या फार्महाऊसला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची जवळची मैत्रीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर याही होत्या. नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या तिघांनी त्या फार्महाऊसवर काय धमाल केली आहे हे आपल्याला त्यात दिसते.
दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं
ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं….
१९७८ साली रंगमंचावर हमीदाबाईची कोठी या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो.. विजया मेहतांच्या तालमीत तयार होता होता , हमिदाबाई ची कोठी, महासागर अशा अविस्मरणीय नाटकांचे प्रयोग करता करता, सहकलाकारांचे मित्र झालो. सुखदुःखात साथ देत, भांडत, हसत मस्तीत जगलो. होता होता आपआपल्या पाऊलवाटा शोधल्या. पण नाती सुटली नाहीत.. संबंध तुटले नाहीत.
आज ४५ हून अधिक वर्ष लोटली आहेत. तरीही स्नेह तसाच आहे, मैत्री वाढली आहे. मागील पानावरून पुढे! गप्पा, विनोद, चर्चा, प्रयोगातल्या आठवणींनी, दिवस रात्र अपुरे पडले! स्वतःच्या हातांने करुन वाढलेलं सुग्रास जेवण, नाना आणि त्याच्या परिवाराचं अगत्य, नाना च्या वाडीतली सुबत्ता… मन तृप्त झालं.
नीना कुळकर्णी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर हजारो लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
Actor Nana Patekar Women Friends Video