विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘इश्कबाज’फेम नकुल मेहता याची पत्नी जानकी पारेख याने ३ फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला. त्यावेळचा तिचा अनुभव आणि पती नकुल मेहता याच्यासोबत अनुभवलेले क्षण तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. लेबर रुममधील एक फोटो देखील तिने या पोस्टमध्ये टाकला आहे. यात तिचा मुलगा सुफी देखील दिसतो आहे.
जानकी आपल्या बाळाकडे पाहते आहे, तर नकुल कॅमेऱ्याकडे बघून हसतो आहे. हा अत्यंत सुंदर फोटो आहे. दुसऱ्या फोटोत व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात जान्हवी आणि नकुल या दोघांचे आई – वडील दिसत आहेत. तर तिसरा फोटो सीझर करतानाचा आहे. यात नकुलने जानकीचा हात धरून ठेवला आहे. हे फोटो शेअर करतानाच तिने आपला अनुभव शेअर केला आहे. जानकीचे सीझर झाले आहे.
जानकी म्हणजे, नॉर्मल डिलिव्हिरीचा अनुभव माझ्याकडे नाही. पण मी जो अनुभव घेतला तो अविस्मरणीय आहे. मला नेहमी असं वाटतं की, माझी जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असती तर सूफीला जन्म देण्याआधी मला खूप त्रास सहन करावा लागला असता आणि मी लवकर बरी झाले असते. पण, या सगळ्यात मला जो आनंद मिळाला तो मिळाला असता का? माझ्या जोडीदाराने माझा हात धरला होता. माझे ऑपरेशन करून माझ्या पोटातून निघालेला नवीन जीव त्याने पाहिला. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत सुंदर आणि हृद्य होता. याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. माझ्या स्त्री रोगतज्ज्ञासह सूर्या रुग्णालयातील नर्स, डॉक्टर, तसेच भूलतज्ज्ञांनी माझी खूप काळजी घेतली. माझ्या बाळाचा जन्म झाला तेव्हा आम्ही इतके खुश झालो की आम्ही आमच्या आई वडिलांना याबाबत सांगायलाही विसरलो. कोणाला पहिल्यांदा कळवावे असा प्रश्न आम्हाला पडला होता. शेवटी नकुलने आमच्या दोघांच्या आई वडिलांना कॉन्फरन्स कॉल केला. याचाच स्क्रीन शॉट आम्ही काढला आहे. जो आम्ही आमचा सूफी मोठा झाल्यावर त्याला दाखवू शकतो.
डिलिव्हरीच्या महत्त्वाच्या वेळी माझा नवरा माझ्यासोबत होता, हा खूपच उत्तम अनुभव होता. एक जोडपे म्हणून हा आमच्यासाठी एक समृद्ध करणारा अनुभव होता. कोरोनाच्या काळात आता पतीला लेबर रुममध्ये जाऊ देत नाहीत. पण याबाबत आम्ही नशीबवान ठरलो. यासोबतच जानकी यांनी अनेकांना आपलेही बाळंतपणाचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन केले आहे.