मुंबई – बॉलिवूडमधील कलाकारांच्या अभिनयाविषयी सर्वजण चर्चा करतात, परंतु त्यांच्या खासगी जीवनाविषयी देखील प्रेक्षकांना उत्सुकता असते. विशेषतः अभिनेते आणि अभिनेत्री खासगी जीवनात नेमके काय करतात ? हे सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. मग तो बिग बी अभिनेता अमिताभ बच्चन असो की किंग खान शाहरुख खान असो किंवा एके काळचा डोस्को डान्स मास्टर मिथुन चक्रवर्ती असो यांच्या बद्दल रसिकांना माहिती हवी असते. वास्तविक त्यांच्या बद्दल थोडीफार माहिती असतेच, परंतु आणखी काहीतरी जाणून घ्यायचे असते.
अनेक कलाकारांची मुले बॉलिवूडमध्ये आपल्या वडिलांचा अभिनयाचा वारसा चालवत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांची सून मदलसा टीव्ही सिरियलद्वारे सर्वांचे मनोरंजन करत आहे. आता त्यांची मुलगी दिशानी अभिनय विश्वात करिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. यापुर्वी मिथुनची दोन मुले महाक्षय आणि नमाशी यांनी अभिनयात पाऊल ठेवले आहे. आता सध्या नाटकाच्या माध्यमात दिशानी हिचे कौतुक होत आहे. मिथुन यांना तीन मुलगे आहेत. तरीही मिथुन आणि त्यांची पत्नी योगिता बाली यांनी दिशानी हिला दत्तक घेतले होते.
दिशानी जेव्हा खूप लहान होती तेव्हा तिला एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फेकून देण्यात आले होते. काही नागरिक या बाळाला पाहून तिथून निघून गेले. मात्र त्यापैकी एकाने या मुलीला घरी नेले. ही बातमी तेव्हा वर्तमानपत्रात आल्यावर मिथुनला कळले. त्यांनी त्या व्यक्तीकडे जाऊन या बाळाला आपल्या घरी आणले. यानंतर त्यांनी या बाळाला म्हणजे दिशानी हिला दत्तक घेतले. दिशानी ही तीन भावांची एकुलती एक बहीण असून ती खूप लाडकी आहे. तिने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून अभिनयाचा अभ्यासक्रम केला पूर्ण आहे. अलीकडेच तिचा नाटकाचा कार्यक्रम झाला. यावेळी अल पचिनोनेही तिचे कौतुक केले आहे. दिशानीने अनेक लघुपटांमध्येही काम केले असून तिला आता बॉलिवूडमध्येही पदार्पण करायचे आहे.