सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राइज, हा चित्रपट अधिकृतपणे ब्लॉकबस्टर म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि हिंदी आवृत्तीसाठी 100 कोटींहून अधिक कमाई करून आधीच सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. हा 2021 मधील सर्वाधिक कमाई करणार्या सिनेमांपैकी एक बनला आहे. अल्लू अर्जुनचे स्टारडम आणि त्याचे लार्जर दॅन लाइफ कॅरेक्टर ‘पुष्पा राज’ ने प्रेक्षकांच्या मनावर राज केला आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना वाटते की अल्लू अर्जुनचा पुष्पा हा 80 आणि 90 च्या दशकातील त्यांच्या मसालेदार चित्रपटांसारखाच आहे आणि म्हणूनच अनेकांना तो आवडला. बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video द्वारे स्ट्रीमिंगमध्ये पदार्पण करणार आहे. मिथुन चक्रवर्तीच्या ‘बेस्टसेलर’ या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये मिथुन चक्रवर्ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मिथुन चक्रवर्ती याने अलीकडेच शोबद्दलच्या संवादादरम्यान ‘पुष्पा’ चित्रपटाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले.तेव्हा ते म्हणाले की गेल्या काही वर्षांमध्ये बर्याच गोष्टी बदलल्या असल्या तरी बर्याच गोष्टी काही दशकांपूर्वी होत्या तशाच आहेत. त्यांचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मिथुनने अल्लू अर्जुन आणि पुष्पा या चित्रपटाचे उदाहरण दिले.
मिथुन चक्रवर्ती म्हटले की, ‘अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट पहा. खरं तर हा सिंगल स्क्रीन चित्रपट आहे. तो इतका मोठा हिट कसा झाला? कारण लोक त्याच्याशी रिलेट करत आहेत. तर पुष्पा मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या काळात केलेल्या चित्रपटांप्रमाणे आहे का? हा सर्व वेळेचा खेळ आहे असे सांगताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘संपूर्ण खेळ हा केवळ गोष्टी दाखवण्याचा एक मार्ग आहे. अल्लू एक सुपरस्टार आहे आणि त्याच्या सुपरस्टारडमचा चित्रपटात अप्रतिम टायमिंगसह चांगला उपयोग करण्यात आला आहे. यामुळेच लोकांना हा चित्रपट आवडला आहे. मी पण पाहिलंय. मला ते आश्चर्यकारक वाटले. मिथुन दा म्हणाले की अल्लू अर्जुन नेहमीच त्यांचा आवडता अभिनेता राहिला आहे. रणवीर सिंगचा चित्रपट 83 सोबत प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाने व्यवसायाच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकले. ‘पुष्पा’सोबत ‘स्पायडरमॅन- नो वे होम’ हा हॉलिवूड चित्रपटही प्रदर्शित झाला पण पुष्पाला कोणीही मागे टाकू शकले नाही.