इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक असणारे नागरिकच नव्हे तर सेलिब्रिटी देखील इलेक्ट्रिक कारकडे आकर्षित झालेले दिसून येतात.
साऊथचे सुपरस्टार महेश बाबू यांनी ऑडीची इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑडी ई-ट्रॉन खरेदी केली आहे. या कंपनीचे भारतातील हे पहिले इलेक्ट्रिक मॉडेल आहे. या वाहनाची किंमत सुमारे 1.14 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे हे वाहन फुल चार्ज करून 484 किमी पर्यंत धावू शकते. स्वत: अभिनेता महेश बाबूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कारच्या डिलिव्हरीचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन यांनीही अभिनेत्याचा फोटो ट्विट केला आहे.
या इलेक्ट्रिक कारमध्ये 95 kWh बॅटरी पॅक आणि ड्युअल मोटर सेटअप आहे. हे एकत्रित 402 bhp आणि 664 Nm पीक टॉर्क बनवते. झटपट टॉर्कसह सुसज्ज, क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम या मोठ्या एसयूव्हीला फक्त 5.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग वाढवण्यास मदत करते.
संपूर्ण चार्ज केल्यावर कार 359-484 किमी पर्यंत प्रवास करते असा दावा करण्यात आला आहे. कार 50 kW फास्ट चार्जरने 2 तासांपेक्षा कमी वेळेत 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. SUV सोबत येणारा 11 kW चा AC चार्जर 8.5 तासात कार 0-80 चार्ज करू शकतो.
सदर इलेक्ट्रिक एसयूव्ही कार ही अनेक लक्झरी फीचर्सने सुसज्ज आहे. यामध्ये 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, 3D प्रीमियम साउंड सिस्टम, डायनॅमिक लाइट स्टेजिंगसह डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, हेड-अप डिस्प्ले आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांचा समावेश आहे. तसेच या कारमध्ये हॅप्टिक फीडबॅकसह सेंटर कन्सोलवर ड्युअल टच स्क्रीनसह व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.