मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलीवूड मधील बहुतांश कलाकारांच्या जीवनात सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल असते, त्यामुळे त्यांना खूप मेहनत करावी लागते. परंतु एकदा नाव लौकीक झाल्यावर मात्र त्यांच्याकडे प्रचंड पैसा जमा होतो. आणि त्यांची पुढची पिढी हा पैसा पक्षाच्या उडवतात असे म्हटले जाते. एका अभिनेत्याच्या बाबतीत असेच घडले असून त्याने याबाबत भाष्य केले आहे.
बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतो. त्याचे ट्विट युजर्सना खूप आवडतात. केआरकेने आपल्या कमाईबद्दल ट्विट केले आहे. तो म्हणाला, माझी मुले एका वर्षात सुमारे ३ ते ४ कोटी खर्च करतात. केआरकेच्या ट्विटवर युजर्सनी त्याची जोरदार खिल्ली उडवली.
https://twitter.com/kamaalrkhan/status/1508664364731371523?s=20&t=PBVcy-MhHjks_qpsgAwMFQ
KRK ने लिहिले, मी जेव्हा नवी दिल्ली येथे एअर कंडिशनर टेक्निशियन म्हणून काम करत होतो तेव्हा मी २५ हजार रुपये कमावण्याचे स्वप्न पाहत होतो, जेणेकरून मी वर्कशॉप उघडू शकेन आणि आनंदाने जगू शकेन. आज माझ्या मुलांवर दरवर्षी कोट्यावधी खर्च होतात. याचा अर्थ असा आहे की, मी माझ्या आयुष्यात बरेच चांगले केले आहे. पण दुर्दैवाने हे सर्व खूप लवकर संपले!”
दरम्यान, त्याच्या या ट्विटवर प्रमानु नावाच्या युजरने लिहिले की, “तुमच्या घरात हॉलंडमधून दूध, पाणी, फ्रान्स आणि लंडनहून चहा येतो आणि बंगला २० हजार स्क्वेअर फूटचा आहे. बिग बॉसमध्ये सांगितल्याप्रमाणे तेही सांगा. तसेच एका वापरकर्त्याने लिहिले, “पण सर तुम्ही इतक्या कमी वेळेत इतके पैसे कसे कमावले?” संजीत कुमार यांनी लिहिले की, माझ्याकडे इतके पैसे असते तर यूट्यूबवर जाहिराती देऊन पैसे कमावले नसते.