इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत आणि त्यासोबतच गोंधळही निर्माण झाला आहे. खरं तर, या फोटोंमध्ये सुनीता मंदिराच्या गर्भगृहात हँडबॅग घेऊन जाताना दिसत आहे. ज्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सुनीतावर जोरदार टीका केली जात आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता १५ मे रोजी महाकाल मंदिरात पोहोचली होती. या काळात सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यानंतर ती लोकांच्या निशाण्यावर आली आहे. यादरम्यान सुनीता महाकाल मंदिराच्या गर्भगृहात एक हँडबॅग घेऊन गेली होती. या मंदिरात पर्स किंवा पिशवी वगैरे नेण्यास सक्त मनाई आहे. अशा परिस्थितीत सुनीतसोबत मंदिरात असलेली बॅग पाहून लोक चांगलेच संतापले आहेत. यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे.
मंदिर समितीनेही त्यांच्या या कृत्याकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल नागरिक करत आहेत. सेलिब्रेटींसाठी नियम वेगळे आहेत का, असा प्रश्न सोशल मिडियात उपस्थित केला जात आहे. यानंतर आता मंदिराच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ सुरू आहे.
ही गंभीर बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच मंदिर प्रशासनाने संबंधितांवर याप्रकरणी कारवाई करण्याचे सांगितले. पिशवी आत नेण्याची परवानगी कशी दिली, याचे फुटेज पाहूनच कारवाई केली जाईल, असे मंदिर प्रशासनाने सांगितले. त्याचा फटका संबंधित अधिकाऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
Actor Govinda Wife Sunita Ahuja Mahakal Temple Troll