सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढला आहे. त्याची मैत्रिण तथा अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्यासोबत त्याने विविध मान्यवरांच्या उपस्थित लग्न केले आहे. खंडाळ्यात एका रिसॉर्टमध्ये हा विवाह समारंभ संपन्न झाला आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू होत्या. त्यांना अनेकदा सोबत पाहण्यात आले. त्यामुळेही जोरदार चर्चा होत होती.
फरहान हा जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे. फरहानने २००० मध्ये हेअर स्टाईलिस्ट अधूना भभानी सोबत लग्न केले. १७ वर्षे संसार केल्यानंनतर फरहानने अधूना सोबत घटस्फोट घेतला. आणि दोघे वेगळे झाले. याचदरम्यान, फरहान हा श्रद्धा कपूर सोबत डेट करीत असल्याचीही चर्चा मधल्या काळात होत होती. मात्र, फरहान आणि त्याची मैत्रिण शिबानी दांडेकर हे सतत बरोबर असतात. एकमेकांना डेट करीत असल्याने आता ते लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चेने गेल्या काही दिवसात जोर पकडला होता.
https://twitter.com/ani_digital/status/1494996237128695815?s=20&t=lboq7Us-LkX3H84YPtjIgQ
आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, डिंपल कपाडिया, प्रीती झिंटा आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दिल चाहता है या चित्रपटाद्वारे फरहान अख्तरने दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट अतिशय हिट झाला. तसेच, या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर फरहानने लक्ष्य, डॉन आणि डॉन 2 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. फरहानने ‘रॉक ऑन’, ‘लक बाय चान्स’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘मिल्खा सिंग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या जी ले जरा या चित्रपटाद्वारे तो पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.