इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्यांचं वक्तृत्व ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात, ज्यांच्या ऐतिहासिक भूमिका पाहिल्यावर त्या भूमिकेतील पात्र समोर साक्षात साकारल्याचा आभास होतो, असे दमदार अभिनय करणारे अभिनेते म्हणजे अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज असो की मग छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. अभिनयासोबत राजकारणात देखील अमोल कोल्हे यांनी आपला ठसा उमटवला आहे. खासदार कोल्हे यांनी दिल्लीच्या संसद भवनात महाराष्ट्राचा आवाज बुलंद ठेवला आहे. असा हा हरहुन्नरी अभिनेता आता एका नव्या प्रकल्पावर काम करत आहेत.
अमोल कोल्हे नव्याने एका मालिकेची निर्मिती करणार आहेत. ही मालिका थोड्या वेगळ्या धाटणीची आहे. ‘प्रेमास रंग यावे’ या नव्या मालिकेची निर्मिती ते करणार आहेत. मालिकेचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यात सारिका नवाथे, अमिता कुलकर्णी, अभिजीत चव्हाण आणि गौरी कुलकर्णी यांसारखे कलाकार दिसणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशनने याची निर्मिती केली आहे. २० फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता ‘सन मराठी’वर ही मालिका प्रक्षेपित होणार आहे
या मालिकेच्या प्रोमोत अक्षरा आणि सुंदर यांची प्रेमकथा दाखवली आहे. अक्षरा ही एक आदर्श मुलगी आहे जिला सर्वांना आनंदात ठेवायला आवडते. अक्षराच्या कुटुंबाला तिचा अभिमान आहे. तिची चांगली काळजी घेणाऱ्या मुलाशी लग्न करावे अशी कुटुंबाची इच्छा आहे. दुसरीकडे, सुंदर हा त्याच्या गावचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यांच्या कुटुंबाला एक सून हवी आहे जी त्यांच्या दर्जाशी आणि श्रीमंतीशी जुळेल. त्यांचे लग्न कसे होणार आणि त्यांच्या आयुष्यात काय घडते हे लवकरच कळेल.
मालिकेच्या निर्मितीबरोबरच ‘शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोगदेखील ते करत आहेत. नुकताच या महानाट्याचा प्रयोग नाशिक येथे पार पडला. या नाटकात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा महाराणी येसूराणी यांची भूमिका साकारत आहे.
Actor Dr Amol Kolhe New Marathi TV Serial Coming Soon