इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायक आशिष विद्यार्थी हे नुकतेच बोहोल्यावर चढले. वयाच्या साठीत त्यांनी नुकतेच रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केले. यानंतर अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. आता यानंतर प्रथमच ते आपला घटस्फोट आणि दुसरे लग्न याबाबत बोलले आहेत.
विभक्त होणे हे सोपे नाही
पहिली पत्नी राजोशी उर्फ पीलूपासून घटस्फोट घेणे आणि तो निर्णय पूर्णत्वास नेणे हे वाटले तितके सोपे नव्हते, असे आशिष विद्यार्थी सांगतात. या लग्नाच्या आमच्या दोघांच्याही खूप छान आठवणी आहेत. पीलू ही केवळ माझ्या मुलाची आईच नाही तर माझी मैत्रीणदेखील असल्याचे ते सांगतात. राजोशीपासून वेगळं होताना त्यांनाही दुःख झाले आणि त्या दोघांसाठीही वेगळे होण्याचा निर्णय कठीण होता. मात्र मी जीवनाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. प्रत्येकजण जीवनात आनंदी राहू शकतो आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केले होते. या पोस्टमधून त्यांनी आशिष यांना टोमणा मारल्याचा आणि त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी दु:ख व्यक्त केल्याचा अर्थ नेटकऱ्यांनी काढला होता.
कशी झाली आशिष – रुपाली यांची भेट?
अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी कोलकातास्थित उद्योजिका रुपाली बरुआशी दुसरं लग्न केलं. आशिष यांनी ते रुपाली यांना कधी आणि कसे भेटले त्याच्याबद्दल सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आशिष म्हणाले की, पीलूसोबत घटस्फोटाची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते रुपालीला त्यांच्या कामानिमित्त एकदा भेटले होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि यादरम्यान आशिष यांना रुपाली यांच्या वाट्यालाही आयुष्यात दुःख आल्याचं त्यांना कळालं. पाच वर्षांपूर्वी रुपालीच्या पतीचे निधन झाले होते आणि तिचा पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नव्हता. संभाषणादरम्यान, आशिष यांना वाटले की रुपाली आयुष्याकडे नव्या नजरेने पाहू शकेल आणि पुन्हा लग्न करण्याचा विचार करेल.
Actor Ashish Vidyarthi After Second Marriage