इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्षेत्र कोणतेही असो त्यात तुमचा संघर्ष हाच तुमची वाट तसेच भविष्य ठरवत असतो. आयुष्याचा प्रवास हा सहज नाहीच पण त्यात रोज होणारी परीक्षा तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाते. असाच काही प्रत्यय या अभिनेत्याला आला आहे. अर्जुन बिजलानी हे छोट्या हिंदी पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक नाव आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्याने घराची संपूर्ण जबाबदारी अर्जुनकडे आली. तरीही आपली आवड जोपासत त्याने पैसे कमवण्याचा निर्णय घेतला. त्याने अनेक ऑडिशन्स दिल्या. पण त्याला अनेकदा रिजेक्शचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचा स्वत:वरचा विश्वास उडाला. काही काळाने त्याला चांगलं काम मिळायला लागलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अर्जुन बिजलानीची गणना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत होते.
अर्जुन बिजलानीने ‘नागिन’, ‘परदेस में है मेरा दिल, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, आणि ‘मिले जब हम तुम ‘ सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. अर्जुन बिजलानी हा छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एका एपिसोडसाठी तो ८० हजार ते १.५ लाख रुपये घेतो. जाहिरातीसाठी ३० ते ४० लाख रुपये आकारतो. पाच कोटींहून अधिक त्याचे वार्षिक उत्पन्न आहे. त्याची एकूण संपत्ती २९ कोटींच्या आसपास आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्यांसह १० कोटींचे आलिशान घर आहे. अर्जुनला अभिनय क्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागली. पण हताश न होता त्याने प्रयत्न सुरू ठेवले.
त्यानंतर २०१४ मध्ये त्याला ‘कार्तिका’ ही मालिका मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून त्याचा मनोरंजनसृष्टीतला प्रवास सुरू झाला. अर्जुनला चार वर्षांच्या संघर्षानंतर म्हणजेच २००८ मध्ये ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ या मालिकेच्या माध्यमातून खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला. करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुन बिजलानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजते.
Actor Arjun Bijlani Life Success Story
Entertainment Bollywood