मुंबई – बॉलीवूड मधील कलाकारांविषयी सर्वसामान्य रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री रेखा आणि हेमामालिनी यांच्या एव्हरग्रीन म्हणजेच आरोग्यपूर्ण चिरतरुण राहण्याचे रहस्य काय आहे? हे अनेकांना जाणून घ्यावेस वाटते. त्याचप्रमाणे आणखी एक अभिनेता म्हणजे अनिल कपूर होय. ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूरचे चहाते त्याच्या आरोग्यपूर्ण जीवनशैली विषयी नियमित जीवनशैलीवर नेहमीच प्रेम करतात. अनिल कपूर जेव्हा त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो, तेव्हा चाहते त्याच्या फिटनेसचे कमेंट बॉक्समध्ये कौतुक करताना दिसतात. मात्र, आता त्याच्या एका पोस्टमुळे चिंता वाढली आहे.
कारण त्याने जर्मनीचा एक व्हिडिओ शेअर केला असून आज त्याच्या उपचाराचा शेवटचा दिवस असून तो डॉक्टरांना भेटणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यात ६४ वर्षीय अनिल कपूर जर्मनीच्या रस्त्यावर वेगाने चालताना दिसत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. जर्मनीतून पोस्ट केलेल्या व्हिडिओत अनिल कपूरने काळा लांब कोट, काळी पँट आणि काळी टोपी घातली आहे. त्याच्यावर बर्फ पडताना दिसत आहे. यासोबत अनिल कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘बर्फात एक परफेक्ट वॉक सुरु असून जर्मनीत शेवटचा दिवस. मी माझ्या शेवटच्या उपचारांसाठी डॉ. मुलर यांना भेटणार आहे. मी त्याचा आणि त्याच्या जादुई स्पर्शाचा आभारी आहे.
https://twitter.com/AnilKapoor/status/1464155549461741572
अनेक अॅप वापरकर्त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्याच्या फिटनेसचे कौतुक केले, तर अनेकांनी त्याच्या उपचारांच्या बातम्यांवर चिंता व्यक्त केली. एकाने लिहिले- ‘सर, कसले उपचार? तुम्ही खूप फिट आहात. तुम्हाला उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा.’ दुसरा म्हणाला, ‘तुम्ही तब्येतीची काळजी घ्या.’ एका चाहत्याने विचारले- ‘सर तुम्हाला काय झाले?’
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, अनिल कपूरने एक पोस्ट लिहिली होती की, मी १० वर्षांपासून अॅचिलीस टेंडनच्या समस्येशी लढत आहेत. त्यावेळी अनिल कपूर यांनी सांगितले की, डॉ. मुलर यांनी त्यांच्यावर उपचार केले असून ते पुन्हा चालू लागले. या आजारात पायांच्या खालच्या भागात प्रचंड त्रास होत असतो, त्यामुळे चालणेही कठीण होते.