इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वयाच्या ८० व्या वर्षातही अत्यंत सक्रिय असणारा, तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने आणि तडफेने काम करणारा अभिनेता म्हणून बिग बी अमिताभ बच्चन प्रसिद्ध आहेत. काळाप्रमाणे होणाऱ्या बदलांशी जुळवून घेत त्यांनी सोशल मीडियावरही आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव आघाडीवर आहे. तर असे हे बिग बी त्यांच्याच एका जुन्या ट्विटमुळे सध्या ट्रोल होतायत.
ट्विटमध्ये काय?
त्यांचे विविध ट्विट अनेकदा चर्चेत येतात. यावेळी अमिताभ बच्चन यांचे खूप जुने ट्विट व्हायरल होते आहे. साधारण १३ वर्षांपूर्वीचे हे ट्विट असून यामुळे त्यांना अनेकांची नाराजी अनुभवावी लागते आहे. या ट्विटमध्ये बिग बी यांनी स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांबद्दल लिहिले आहे. १२ जून २०१० रोजी रोजी दुपारी ३.२४ वाजता केलेले हे ट्विट ‘ब्रा’ आणि ‘पँटीज’ यावर भाष्य करते. बिग बी लिहितात, ‘इंग्रजी भाषेत, ‘ब्रा’ एकवचन आणि ‘पँटीज’ अनेकवचन असे का आहे?
बिग बींना असा प्रश्न का विचारला असेल यावर नेटिझन्सचा विश्वास बसत नसून युझर्सनी त्यांना ट्रोल केले आहे. शिवाय त्यांचे हे जुन ट्विट रीट्वीट करत काही सवालही केले आहेत.
एका युझरने म्हटले की, ‘अमितजी, हे काय वर्तन आहे?’ तर दुसरा म्हणतो की, असे प्रश्न विचारणे हे तुमच्याकडून अपेक्षित नाही. तुम्ही माफी मागितली पाहिजे.’ महानायकाचे हे ट्विट काहींना अजिबात आवडलेले नाही. अमिताभ यांच्या ट्वीटवर आलेल्या काही प्रतिक्रिया अगदी काहीच तासापूर्वीच्या आहेत, तर काही जुन्या आहेत. मात्र, ट्विटरवर असे प्रश्न विचारण्याची गरज बिग बींना का भासली?, याचे लोकांना आश्चर्य वाटते.
नवीन प्रोजेक्ट्स
सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती १५’ चे शूटिंग सुरू केले आहे. शिवाय त्यांचा प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबतचा ‘कल्की २८९८ एडी’ हा सिनेमाही रिलीजच्या तयारीत आहे.