इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वयाच्या पंचाहत्तरीत सुद्धा तरुणांना लाजवेल असा उत्साह घेऊन बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन आजही १४ तासांहून अधिक काम करतात असा खुलासा नुकताच त्यांनी केला. चित्रपटांसह ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच तुफान प्रतिसाद मिळाला. याच कार्यक्रमातून त्यांच्या आयुष्यातल्या काही घडामोडी, काही किस्से, काही गुपितं ते सांगत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या बंगल्याचे नाव ‘प्रतीक्षा’ का आहे, याचा खुलासा केला.
मुंबई येथे बहुतांश कलाकारांचे बंगले आहेत. या बंगल्यांची नावे देखील रंजक आहेत. त्या नावात काहीतरी वेगळेपण असल्याचे आपण अनेकदा अनुभवलं आहे. जुहू येथे अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला आहे. पूर्वी अमिताभ बच्चन आई-वडिलांबरोबर त्या बंगल्यात राहत होते. पण त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर अमिताभ ते आता राहत असलेल्या ‘जलसा’ बंगल्यात राहायला आले. आता अमिताभ बच्चन कुटुंबीयांसह ‘जलसा’मध्ये राहतात. मात्र, ‘प्रतीक्षा’ हा बंगला अजूनही त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. ते अनेकदा वेळ घालवण्यासाठी ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर जातात.
ते म्हणाले की, “लोक मला नेहमी विचारतात की तुम्ही घराचे नाव प्रतीक्षा का ठेवलेस? त्यांना सांगू इच्छितो की हे नाव मी निवडलेले नाही. तर माझ्या वडिलांनी या बंगल्याचे नाव ‘प्रतीक्षा’ ठेवले आहे. मी एकदा माझ्या वडिलांना विचारले की, तुम्ही प्रतीक्षा हे नाव का ठेवले? तेव्हा अमिताभ यांच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या एका कवितेतून त्यांनी हे नाव निवडले आहे. त्या कवितेची एक ओळ सांगते की, ‘सर्वांचे स्वागत आहे, पण कोणाचीही प्रतीक्षा नाही,’ म्हणून आमच्या घराचे नाव प्रतीक्षा आहे.” हरिवंशराय बच्चन हे महान कवी होते. आणि महानायक अमिताभ हे वडिलांच्या खूप जवळ होते.
https://twitter.com/SrBachchan/status/1572822045276409859?s=20&t=4LBP2Qvf1tJA6WsfeV3K8g
Actor Amitabh Bachhan Bungalow Name
Entertainment Bollywood