इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे जगभरात चाहते आहेत. त्यांचे पॅशन असलेल्या अभिनयापासून सध्या ते लांब राहिलेले आहेत. चित्रीकरणादरम्यान त्यांना पुन्हा दुखापत झाली, आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या ते सक्तीच्या विश्रांतीवर आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या ते विश्रांती घेत आहेत. मात्र, अजूनही त्यांचे त्रास कमी झाले नाहीत, उलट वाढले आहेत. याचा उल्लेख अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये केला आहे. अमिताभ बच्चन यांना सध्या पायाच्या बोटांचाही त्रास आहे. आणि बिग बी असे म्हणतात की, याच त्रासाने अनेक लोक ग्रासले आहे. आणि यात थोडे जरी दुर्लक्ष झाले तर खूप त्रास होतो.
१९ मार्च रोजी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, बरगड्यांचे दुखणे सुरूच आहे. मात्र, पायाच्या बोटांच्या समस्येमुळे बरगड्यांपेक्षा जास्त त्रास होतो आहे. “तेथे फक्त कॉलस नाही तर त्याखाली फोडही आला आहे. ज्यामुळे त्रास आणखी वाढला आहे.” आपल्या त्रासाबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणतात की यासाठी कोमट पाण्यात पाय बुडवले, पण तो उपायही काही फायदेशीर ठरला नाही. एवढा भयानक त्रास मी माझ्या आयुष्यात कधीच सहन केला नसल्याचे बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.
कॉलस म्हणजे काय?
कॉर्न आणि कॉलस हा त्वचेचा एक पॅच आहे जो शरीरावर कुठेही वाढू शकतो. सामान्य भाषेत याला गाठ असेही म्हणतात. सहसा ते वेदनाविरहित असतात परंतु जर संसर्ग झाला असेल तर ते खूप त्रासदायक ठरतात.
Actor Amitabh Bachchan Injury Pain Post