इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात पाच दशकांहून अधिक काळ योगदान देणारे तसेच दोनशेंहून अधिक चित्रपटात भूमिका साकारणारे बिग बी म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन हे नाव सर्वांचेच लाडके अभिनेता आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो त्यांच्या निवेदनामुळे फारच लोकप्रिय झाला आहे.
याच शो दरम्यान आपण किती तास काम करतो याचे उत्तर स्वतः बिग बी यांनी दिले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात स्पर्धकांशी बोलताना आपण सुमारे १२ तासांहून अधिक काम करत असल्याचे अमिताभ यांनी सांगितले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी इतके काम हे नवतरुणाला लाजवण्यासारखे असल्याचे मत नेटकरी व्यक्त करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही फार सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी अनेक प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो ते कायमच पोस्ट करतात. अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ वा सीझन सध्या होस्ट करत आहेत. नुकताच ‘कौन बनेगा करोडपती’चा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अमिताभ यांच्यासोबत हॉटसीटवर गुजरातवरून आलेले डायमंड कटिंग पॉलिशर स्पर्धक बसले आहेत.
अमिताभ बच्चन ७९ वयाचे असून अजूनही ते तब्बल १२ तास काम करतात. बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन सकाळी ६ ला शूटिंगला सुरूवात करून रात्री ८ किंवा १० पर्यंत शूटमध्ये व्यस्त राहतात. याचा खुलासा स्वत: अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या त्यांच्या प्रसिध्द शोमध्ये केलायं. अमिताभ बच्चन ७९ वर्षांचे झाले असतील पण आजही ते कामाबद्दल तेवढेच समर्पित आहेत, जेवढे ते ४० वर्षांपूर्वी होते.
प्रोमोमध्ये दिसत असल्यानुसार अमिताभ बच्चन डायमंड कटिंग पॉलिशर असलेल्या स्पर्धकाला विचारतात की, खरा डायमंड तुम्ही कसे ओळखतात. त्यावर डायमंड कटिंग पॉलिशर उत्तर देतो आणि सांगतो की, त्याला कितीही डिग्री तापमानावर गरम करा खरा हिरा आपले रूप बदलत नाही, तसेच अमिताभ यांनी स्पर्धकाला प्रश्न केला की तुम्ही किती वेळ काम करता, यावर मी १२ तास काम करतो, असे स्पर्धकाने सांगितले. यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, मग आपले सारखेच आहे. मी सकाळी ६ ला कामाला सुरूवात करतो आणि रात्री ८ पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त शूटिंग सुरूच असते. मात्र, अमिताभ बच्चन यांचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसलाय. ७९ वर्षांचे असूनही अमिताभ बच्चन १२ तास काम करतात.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘सात हिंदुस्तानी’ नावाच्या चित्रपटाने केली. त्यानंतर त्यांनी बर्याच चित्रपटात काम केले पण १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. त्यानंतर त्यांचे ‘दिवार’, ‘शोले’ असे बरेच चित्रपट गाजले. १९८० च्या दशकामध्ये ते खासदार पण होते. त्यांनी अमिताभ बच्चन कार्पोरेशन नावाची स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुद्धा काढली होती पण त्यात त्यांना खूप नुकसान झाल्यामुळे ती बंद करावी लागली. त्यानंतर काही काळ ते चित्रपट जगतापासून दूर राहिले. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृत्युदाता’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट जगतात पुन्हा पदार्पण केले. २००० साली त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोमध्ये निवेदन करण्याची संधी मिळाली.
Actor Amitabh Bacchan Daily Work Hours in this Age
Bollywood KBC Big B
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD