सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ मधील श्रीवाल्ली आणि सामी सामी या गाण्यांवर अनेकांचे पाय थिरकले आहेत. परंतु अल्लू अर्जुनची मुलगी अरहाने दुसऱ्याच गाण्याची निवड केली. तुम्ही अनेक सेलिब्रिटींना इन्स्टाग्राम वरील व्हायरल ‘कच्चा बदाम’ ट्रेंड फॉलो करताना पाहिले असेल. अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अरहा ही देखील या ट्रेंड मध्ये सामील होणारी नवीनतम व्यक्ती आहे. अल्लू अर्जुनच्या लाडलीनेही या गाण्यावर डान्स केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याची मुलगी अरहाचा ‘कच्चा बदाम’वर नाचतानाचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अरहा गुलाबी रंगाच्या नाईट सूटमध्ये अतिशय क्यूट डान्स करताना दिसत आहे आणि हा अल्लू अर्जुनने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. पुष्पा अभिनेत्याने व्हिडिओला “माय लिल बदाम अरहा” असे कॅप्शन दिले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 30 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कच्चा बदाम हे गाणे मूळत: पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भुबन बद्यकर यांनी तयार केले आहे. त्यांच्याकडील वस्तू विकण्यासाठी ते आपल्या मधुर आवाजाचा वापर करत असे. हे गाणे त्यांच्या एका ग्राहकाने ऑनलाइन शेअर केल्यावर ते गाणे व्हायरल झाले.
अल्लू अर्जुनने अल्लू स्नेहा रेड्डीशी लग्न केले. त्यांना अरहा ही मुलगी आणि अयान हा मुलगा आहे. अरहाचा जन्म 21 नोव्हेंबर 2016 रोजी झाला. अरहा लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. ‘शाकुंतलम’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटात समंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अरहा या चित्रपटात राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. अल्लू अर्जुन अनेकदा आपल्या मुलीसोबत मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अल्लू अर्जुनचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. अरहा ही कच्चा बदामावर नाचताना ज्या पद्धतीने क्यूट एक्सप्रेशन देतेय ते चाहत्यांना खूप आवडले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी अरहाच्या इन्स्टाग्राम रिलचे खूप कौतुक करत आहेत. अल्लू अर्जुनच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, अल्लू अर्जुन डान्स हा तुमच्या मुलीच्या रक्तात आहे, तो खूप क्यूट आहे. गॉड ब्लेस’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘पुष्पा झुकेंगा नाही’. अल्लू अर्जुनच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी अरहाला खूप प्रेम दिले आहे.