मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या जीवनात प्रत्येक मनुष्याला काहीतरी आणि कशाचा तरी छंद असतो किंवा आवड असते तसेच काही व्यक्तींना वेगवेगळ्या गोष्टी जमविण्याचा छंद असतो, त्यातच एखादा सेलिब्रिटी असेल तर त्याच्या छंदाविषयी विशेष चर्चा होते. बॉलीवूडमधील काही कलाकारांचे देखील असे आगळेवेगळे छंद आहेत. त्याबद्दल रसिकांना नेहमीच उत्सुकता असते
‘खिलाडी’ या नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रत्येक शैली खास आहे. अक्षय कुमार केवळ रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकतो. तसेच अक्षय कुमारचे एका वर्षात सुमारे 3-4 चित्रपट प्रदर्शित होतात आणि जवळपास सर्वच हिट देखील होतात, त्याचप्रमाणे अक्षय कुमारला बाइक्स जमविण्याचा शौक तथा छंद आहे आणि त्याचे हे कलेक्शन पाहून काही रसिक म्हणा तात, अरे बापरे फारच भारी हं !..
यामाहा Vmax
अक्षय कुमारच्या बाईक कलेक्शनमध्ये क्रूझर Yamaha Vmax चा समावेश आहे. 4-सिलेंडर आणि 1679 cc Yamaha Vmax सुमारे 197.3 Bhp पॉवर आणि 166.8 Nm टॉर्क निर्माण करते. ही बाईक खूप महाग असून अक्षय कुमारने देसी बॉईज या चित्रपटात तिचा वापर केला आहे. तसेच या बाईकची किंमत सुमारे 27 लाख रुपये आहे.
हार्ले डेव्हिडसन व्ही-रॉड
अक्षय प्रमाणे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला बाइक्सची खूप आवड आहे. अक्षय आणि जॉन अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत.विशेष म्हणजे 2009 मध्ये गरम मसाला चित्रपटाच्या यशानंतर जॉन अब्राहमने अक्षयला हार्ले डेव्हिडसन व्ही-रॉड ही बाईक भेट दिली होती. या बाईकची किंमत जवळपास 22 लाख रुपये आहे.
होंडा XRV 750
अक्षय कुमारच्या कलेक्शनमध्ये Honda XRV750T चाही समावेश आहे. ही बाईक खूप मजबूत आहे आणि एका रिपोर्ट्सनुसार, ती बाईक 1996 ते 2003 पर्यंतच बाजारात होती. या बीस्ट बाईकची किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे.
कस्टम रॉयल एनफील्ड थंडरबर्ड 350
अक्षय कुमारच्या बंगल्यात कस्टम मेड रॉयल एनफील्ड थंडरबर्ड 350 ही बाईक देखील समाविष्ट आहे. तसेच ओ माय गॉड या चित्रपटासाठी ही बाईक खास मॉडिफाय केली होती. चित्रपटात कान्हा बनलेला अक्षय ही मॉडिफाईड बाइक चालवताना दिसला. त्याचवेळी अक्षय कुमार अन्य चित्रपटात ही बाईक वापरताना दिसला.