इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील कलाकार हे चाहत्यांच्या अत्यंत जवळचे असतात. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं याची चाहत्यांना फारच उत्सुकता असते. त्यातही त्यांचं लव्ह लाईफ म्हणजे तर चाहत्यांसाठी हॉट टॉपिक. काही कलाकार मंडळी आपल्या रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य करतात. तर काही मंडळी आपल्या नात्याबाबत न बोलणंच पसंत करतात. कलाकारांचं रिलेशनशिप कोणापासून लपून राहिलेलं नाही. असंच काहीसं अजिंक्य ननावरे याच्याबाबतही घडलं.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमधील अजिंक्य या मालिकेमध्ये अद्वैत हे पात्र साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अद्वैत त्याच्या कामाबरोबरच लव्ह लाइफमुळेही नेहमी चर्चेत असतो. गेली काही वर्ष अजिंक्य हा अभिनेत्री शिवानी सुर्वेला डेट करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये शिवानीने सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमात असतानाच तिने आपल्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. शिवानी आणि अजिंक्यने कपल टॅटूही काढला आहे. शिवानी १९ तर अजिंक्य २२ वर्षांचे असल्यापासून एकमेकांना ओळखत आहेत. शिवानीने आजवर मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ती महेश मांजरेकर दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटातही दिसणार आहे. अजिंक्यही एक उत्तम अभिनेता आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सख्या रे’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालितकांमध्ये अजिंक्यने काम केलं आहे. शिवानी आणि अंजिक्यने ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हाच या दोघांमध्ये चांगली मैत्री जमली आणि त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
https://twitter.com/zeemarathi/status/1630198567762636803?s=20
Actor Ajinkya Nanaware Affaire with Actress