मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचा आज वाढदिवस आहे. त्याचे आजवरचे आयुष्य नेहमीच चर्चेते राहिले आहे. निर्माता किरण राव यांच्याशी काडीमोड झाल्यानंतर अभिनेते आमीर खान याने अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्याशी लग्न करणार असल्याच्या अफवा सातत्याने पसरत आहेत. आपल्या आगामी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमीर खान लग्नाची घोषणा करणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. परंतु फेसबुक पोस्टमध्ये आमीर आणि फातिमा यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले जात असून, दोघांनी विवाह केल्याचा दावा केला जात आहे.
फेसबुरवर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये आमीर आणि फातिमा यांच्या फोटोखालील ओळींमध्ये फातिमा शेख तीच अभिनेत्री आहे जिने दंगल चित्रपटात आमीर खानच्या मुलीची भूमिका केली होती. चित्रपटात फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती. आज आमीर खानची तिसरी बेगम झाली आहे. ही त्यांची खासगी बाब आहे. परंतु हे तेच आमीर खान आहेत जे सत्यमेव जयतेची जाहिरात करत होते. आता समाजातील बहुविवाहावर बोलतील का?
या दाव्यात किती तथ्य आहे हे दस्तुरखुद्द आमीर खानच सांगू शकतो. व्हायरल फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे. खर्या फोटोमध्ये आमीर खान, किरण राव एकत्र उभे आहेत. कोणीतरी एडिटिंग करून किरण रावच्या जागी फातिमाचा चेहरा लावला आहे. हा फोटो आकाश अंबानी याच्या साखरपुड्यातील आहे. त्यावेळी आमीरचा किरण रावशी घटस्फोट झाला नव्हता.
आमीर आणि किरण राव यांनी वेगळे होण्याची घोषणा करताना सांगितले होते की, आपल्या १५ वर्षांच्या सुंदर प्रवासात आम्ही एकसाथ जीवनभराचा अनुभव, आनंद घेतला आहे. आमचा संबंध विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळे वाढला आहे. आता आम्हाला जीवनातील नवीन अध्याय सुरू करायचा आहे. आता पती-पत्नी नव्हे तर एकमेकांचे सहपालक आणि कुटुंब म्हणून सुरू करणार आहोत.
दोन लग्न, पण आता एकटा
आमिर खानाचे पहिले लग्न हे कयामत से कयामत तक सिनेमाचे शूटिंग सुरु असतांना रिना दत्ताशी झाले होते. पण, त्याने २००२ मध्ये पहिला घटस्फोट घेतला. या पहिल्या लग्नापासून झालेले जुनैद आणि आयरा ही दोन्ही मुले आई रिनासोबतच राहतात. तर दुसरे लग्न किरण राव बरोबर केले. या लग्नापासून त्यांना आझाद हा १० वर्षाचा असून तो आई किरण बरोबर राहणार आहे. २०११ मध्ये सरोगेसीव्दारे आझादचा जन्म झाला होता. किरण राव बरोबर आमिर खान यांची भेट लगान सिनेमाच्या सेटवर झाली होती. तेव्हा ती सहाय्यक दिग्दर्शक होती. यावेळी त्यांनी एकमेकांना दोन वर्ष टेड केल्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.
Happy birthday Aamir Khan!
Wishing you lots of love and happiness ? pic.twitter.com/OmO6quJ1cZ— Ajay Devgn (@ajaydevgn) March 14, 2022