पुणे – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यापूर्वीही ते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. आता त्यांनी पंढरपूर वारी आणि कोरोना यंसंबंधी वक्तव्य केले आहे. भिडे म्हणाले की, कोरोना हे केवळ थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाठवित आहे, हे समजायला मार्ग नाही. पण, हे सर्व देशात चाललेले षडयंत्र असल्याचे भिडे यांनी म्हटले आहे. पंढरपूरच्या वारीवर घालण्यात आलेली बंदी झुगारुन वारकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरायला हवे होते. सध्याचे राज्यकर्ते हे किंमतीचे नाहीत, असे भिडे यांनी म्हटल्याने मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कोरोनामुळे केवळ आणि केवळ भितीचे वातावरण तयार झाले आहे. वारीला जर बंदी घातली नसती तर संपूर्ण जगाला कळाले असते की कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोना हे षडयंत्र असून ते आता देशाचे दुर्दैव आहे, असेही भिडे यांनी म्हटले आहे.