शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बनावट दारू साठ्यावर कारवाई ; ५१.३२ लाखाचा मुद्देमाल जप्त

by India Darpan
जून 7, 2025 | 7:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
बनावट देशी दारू

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ए. के. इलेक्ट्रीकल्स समोर, मुंब्रा-पनवेल रोड, मुंद्रा, शिळफाटा (ता. जि. ठाणे) येथे बेकायदेशीररित्या बनावट देशी दारुचा साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ५ जून रोजी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५१ लाख ३२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंब्रा-पनवेल रोड, मुंब्रा, शिळफाटा या परिसरातून गोवा राज्यातील बनावट देशी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या टीमने सापळा रचत चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीच्या क्र. जीजे-०६-बीव्ही-५८२२ या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातील बनावट देशी दारुचे ९० मिलीचे १२१ बॉक्स व १८० मिलीचे ७२९ बॉक्स जप्त केले. यामध्ये आरोपी लक्ष्मण सिंह नाथू सिंह राठोड, वय ३७ वर्षे, रा. बस्सी, ता. सलुंबर, जि. उदयपुर (राजस्थान) यास अटक करुन परराज्यातील बनावट देशी दारु वाहतुकीसाठी वापरलेला चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीच्या वाहनासह गोवा राज्यातील बनावट देशी दारुचे एकूण ८५० बॉक्स, एक मोबाईल व एका वाहनासह अंदाजे किंमत ५१,३२,९४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक श्री. यादव, रिंकेश दांगट, व्हि. व्हि. सकपाळ, सहा. दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, तसेच जवान श्रीराम राठोड, हनुमंत गाढवे, अमीत सानप, कुणाल तडवी, हर्षल खरबस यांनी यशस्वीरित्या पार पाडली. दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव हे पुढील तपास करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, शनिवार, ७ जूनचे राशिभविष्य

Next Post

आदिवासी गावाची भरारी…या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार

Next Post
WhatsApp Image 2025 06 06 at 6.41.48 PM 1024x576 1

आदिवासी गावाची भरारी…या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार

ताज्या बातम्या

Raj Thackeray e1699613188472

राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले मातोश्रीवर निघालोय…नेमकं काय घडलं

जून 7, 2025
Gsxxx2wXEAACwwb 1024x684 1

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी

जून 7, 2025
rape

फोरच्युनर कारने पाठलाग करीत महिलेचा विनयभंग…नाशिकमधील घटना

जून 7, 2025
Monsoon Camp Tata Motors e1749292171123

टाटा मोटर्सकडून देशभरात मान्‍सून चेक-अप कॅम्‍प…ग्राहकांसाठी मोफत वेईकल तपासणीसह हे फायदे

जून 7, 2025
cbi

सीबीआयने साडेचार लाख रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला केली अटक

जून 7, 2025
jail11

पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पाहूण्यास लुटणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011