नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय आश्रमशाळेला भाड्याने दिलेल्या इमारतीचे थकित घरभाड्याचे बिल मंजुर करण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाचे लेखा अधिकारी भास्कर रानोजी जेजुरकर (५३) हे १० हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.
या प्रकरणाबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा मालकीची त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथील गट नं.७९/२ व ७९/३ मध्ये इमारत क्रमांक ४२२/१,४२२/२ असे दोन वसतिगृह आहेत त्यापैकी ४२२/१ ही ९९ हजार ९९८ रुपये मासिक दराने तर ४२२/२ ही इमारत मासिक ५५ हजार ८८ रुपये मासिक दराने तक्रारदार यांचे वडिलांनी २०२१ ते २०२४ ( तीन वर्षाकरीता) शासकीय आश्रमशाळा, आंबोली ता.त्र्यंबक जिल्हा-नाशिक यांना भाडेतत्त्वावर दिलेली आहे.
त्यापैकी इमारत क्रमांक ४२२/१ चे माहे एप्रिल २०२३ ते माहे जून २०२३ पावेतोचा एकूण घरभाडे २ लाख ९३ हजार ९९४ रुपये तसेच इमारत क्रमांक ४२२/२ चे माहे एप्रिल २०२३ ते माहे जून २०२३ पावेतोचा एकूण घरभाडे १ लाख ६५ हजार २६४ रुपये असे दोन्ही इमारतीचे एकूण ४ लाख ५९ हजार २५८ रुपये थकित घरभाडे मिळण्याकरीताची बिले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक यांच्याकडे पाठविण्यासाठी तेथील लेखा अधिकारी, भास्कर रानोजी जेजुरकर यांचेकडे पडताळणी करणेसाठी प्रलंबित होते. सदरील बिलांची पडताळणी करून प्रकल्प अधिकारी, नाशिक यांच्याकडे मंजुरीकरीता सादर करणेसाठी आलोसे भास्कर जेजुरकर ,लेखा अधिकारी यांनी १७/८/२०२३ रोजी लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज दिनांक १८/८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – ला.प्र.वि. नाशिक
*तक्रारदार- पुरुष, ३७ वर्ष, रा. नाशिक
*आलोसे – भास्कर रानोजी जेजुरकर वय् – ५३ वर्ष,
धंदा – लेखाअधिकारी, वर्ग २,आदिवासी विकास प्रकल्प नाशिक,
सध्या रा. कुलस्वामिनी रो हाऊस, नंबर २, भवानी पार्क, भगवती नगर, हिरावाडी, नाशिक
*लाचेची मागणी- १०,००० रुपये ( दहा हजार रुपये )
*लाच स्वीकारली – १०,००० रुपये ( दहा हजार रुपये )
*लाचेचे कारण – तक्रारदार यांचा मालकीचे आंबोली ता.त्र्यंबक जिल्हा- नाशिक येथील गट नं.७९/२ व ७९/३ मध्ये इमारत क्रमांक ४२२/१,४२२/२ असे दोन वसतिगृह आहेत त्यापैकी ४२२/१ ही ९९ हजार ९९८ रुपये मासिक दराने तर ४२२/२ ही इमारत मासिक ५५ हजार ८८ रुपये मासिक दराने तक्रारदार यांचे वडिलांनी २०२१ ते २०२४ ( तीन वर्षाकरीता) शासकीय आश्रमशाळा,आंबोली ता.त्र्यंबक जिल्हा-नाशिक यांना भाडेतत्त्वावर दिलेली आहे. त्यापैकी इमारत क्रमांक ४२२/१ चे माहे एप्रिल २०२३ ते माहे जून २०२३ पावेतोचा एकूण घरभाडे २ लाख ९३ हजार ९९४ रुपये तसेच इमारत क्रमांक ४२२/२ चे माहे एप्रिल २०२३ ते माहे जून २०२३ पावेतोचा एकूण घरभाडे १ लाख ६५ हजार २६४ रुपये असे दोन्ही इमारतीचे एकूण ४ लाख ५९ हजार २५८ रुपये थकित घरभाडे मिळण्याकरीताची बिले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक यांच्याकडे पाठविण्यासाठी तेथील लेखा अधिकारी, भास्कर रानोजी जेजुरकर यांचेकडे पडताळणी करणेसाठी प्रलंबित होते. सदरील बिलांची पडताळणी करून प्रकल्प अधिकारी, नाशिक यांच्याकडे मंजुरीकरीता सादर करणेसाठी आलोसे भास्कर जेजुरकर ,लेखा अधिकारी यांनी १७/८/२०२३ रोजी लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज दिनांक १८/८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :- मा.संचालक, संचालनालय,लेखा व कोषागार, मुंबई महाराष्ट्र राज्य.
*सापळा अधिकारी – स्वप्निल राजपूत, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सह् सापळा अधिकारी – संदिप घुगे – पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक,
सापळा पथक–
पो. ना. प्रभाकर गवळी
पो. ना. संदीप हांडगे
पो. शि. किरण धुळे
Accounts officer caught in ACB’s net while accepting bribe of 10 thousand