इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिजनौरःबिजनौरमध्ये एका भरधाव वेगातील कारची रिक्षाला धडक बसली. टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. या अपघातात वधू-वरांसह सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वराची मावशी, काका आणि चुलत बहीण यांचा समावेश आहे. कारमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुपारी दीड वाजता वधू-वर झारखंडहून मुरादाबाद स्टेशनवर उतरले. तेथून ते एका रिक्षाने बिजनौरमधील धामपूरला जात असताना राष्ट्रीय महामार्ग-७४ वर कारची त्यांना मागून धडक बसली. शनिवारी रात्री दोन वाजता अग्निशमन केंद्राजवळ हा अपघात झाला. इथून वराचे घर अवघ्या ५ किलोमीटरवर आहे. बिजनौरच्या तिबरी गावात राहणारा खुर्शीद हा मुलगा विशालच्या लग्नासाठी झारखंडला गेला होता. १४ नोव्हेंबरला लग्न होते. लग्न झाल्यानंतर शुक्रवारी ते कुटुंबासह गावी परतत होते. त्याच्यासोबत विशाल, त्याची पत्नी खुशी, काकू रुबी, काका मुमताज, चुलत बहीण बुशरा आणि इतर दोन कुटुंबीय होते.
ट्रेनने मुरादाबाद स्टेशनला आले. तेथून घरी येण्यासाठी रिक्षा बुक केली होता. धामपूर अग्निशमन केंद्राजवळ क्रेटा कारची त्यांच्या रिक्षाला धडक बसली. या अपघातात खुर्शीद (६५), विशाल (२५), खुशी (२२), मुमताज (४५), रुबी (४२), बुशरा (१०) आणि ऑटोचालक अजब यांचा मृत्यू झाला.