मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड तालुक्यातील मालेगाव -मनमाड रोडवर कुंदलगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकी स्वार सोमनाथ आंनदा वाघ (३६) हे गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरु असतांना त्यांचे निधन झाले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला साअज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची तक्रार नागापूर येथील सारिका सोमनाथ वाघ यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पती सोमनाथ आंनदा वाघे हे दुचाकी क्रमांक एम.एच.15/ सी.क्यु. 8684 हिचेवर बसून एरंडगाव येथून घरी नागापूर येथे येतांना कुंदलगाव शिवारात मनमाड बाजुकडून मालेगावकडे जाणा:या एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात पती सोमनाथ आंनदा वाघ हे गंभीर जखमी झाले त्यांचे दवाखान्यात उपचार सुरु असतांना निधन झाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरीचंद्र पालवी हे करीत आहेत.