शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इको कारची ट्रकला धडक…सहा यात्रेकरू अपघातात ठार

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 19, 2024 | 5:51 pm
in संमिश्र वार्ता
0
accident 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भरूचः गुजरातमधील भरूच जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. शुक्लतीर्थ जत्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या इको कारची जंबुसर-आमोद रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. कारमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांसह एकूण सहा जण होते. कारची धडक एवढी भीषण होती की, कारचे छत उडून गेले. बचाव पथकाने अपघातस्थळी पोहोचून मोठ्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढले.

भरूचमधील जंबुसर-आमोद रोडवर झालेल्या अपघातात सपनाबेन जयदेव गोहिल, जयदेव गोविंदभाई गोहिल, कीर्तिकाबेन अर्जुनसिंग गोहिल, हंसाबेन अरविंद जाधव, संध्याबेन अरविंद जाधव आणि विवेक गणपत परमार यांचा समावेश आहे. हे सर्व लोक जंबुसरमधील वेडच आणि पंचकडा गावातील रहिवासी होते. अपघात झाला त्या वेळी हे सर्व जण शुक्लतीर्थ येथे सुरू असलेल्या जत्रेला भेट देण्यासाठी गेले होते आणि तेथून परतत असताना हा अपघात झाला. ईको कार उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती की कारचे पूर्ण नुकसान झाले असून त्यातील लोक चांगलेच अडकले आहेत.

ट्रक इंडिकेटर न देता उभा करण्यात आला होता. समोरून येणाऱ्या प्रखर दिव्यामुळे चालकाला काही दिसले नाही. त्यामुळे अपघात झाला. आनंद अपघातात भरधाव वेग आणि रस्त्यावरील गर्दीमुळे हा अपघात झाला. या रस्ता अपघाताच्या काही तासांपूर्वी सोमवारी सकाळी गुजरातच्या आणंद जिल्ह्यात आणखी एक भीषण रस्ता अपघात झाला. अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर पहाटे साडेचारच्या सुमारास खासगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये धडक झाली. ही बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आणि पोलिसांनी रुग्णालयात नेले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला…!…सुषमा अंधारे यांची सोशल मीडियावर पोस्ट

Next Post

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास प्रतिबंध…निवडणूक आयोगाचे सक्त निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास प्रतिबंध…निवडणूक आयोगाचे सक्त निर्देश

ताज्या बातम्या

RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 9, 2025
girish mahanjan e1704470311994

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय…इतका निधी मिळणार

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011