मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. ते ६२ वर्षांचे होते. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या विनायक मेटे यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
या अपघाताआधीचा मृत्यूपूर्वीचा विनायक मेटे यांचा अखेरचा फोटो समोर आला आहे. या मध्ये विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसून आला आहे. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आले होते. त्यांना शुद्ध नव्हती. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्याच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता. हनुवटीला आणि चेहऱ्याच्या खालच्या बाजूला मोठं रक्त लागल्याचंही दिसून आलं होतं. तसंच शर्टावरही रक्ताचे डाग लागल्याचं दिसून आलंय. या अपघातामुळे विनायक मेटे यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले. छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.
विनायक मेटे यांची राजकीय कारकिर्द
– विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
– मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
– मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.
– अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
– बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
– सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
– त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य