बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुचाकीवर रिल बनविण्याचा मोह जीवावर बेतला; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

by India Darpan
जानेवारी 28, 2023 | 1:40 pm
in संमिश्र वार्ता
0
accident 2

 

परभणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलिकडे रिल बनवून सोशल मीडियावर पोस्ट फॅड चांगलेच वाढले आहे. कोण कशाची रिल बनविल याचाही काही नेम राहिला नाही. अनेक जण थरार अनुभवत रिल शुट करीत असल्याचेही दिसते. असेच धाडस शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले. चार शाळकरी विद्यार्थी चालत्या वाहनावर स्वार होऊन रिल बनवित होते. अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात दोघांनी जीव गमावला तर दोघे गंभीर जखमी आहेत. ही दुर्दैवी घटना पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे प्रजासत्ताक दिनी घडली.

प्रजासत्ताक दिनाचा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी स्वप्निल ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल महादू तिथे, योगानंद कैलास घुगे, शंतनू सोनवने हे चारही विद्यार्थी एकाच दुचाकीवरून शाळेत चालले होते. वाटेत त्यांनी मोबाइलवरून रिल बनविणे सुरू केले. वेगात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात चारही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईला आणण्यात आले. त्यातील स्वप्निल चव्हाण या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने लातूरला हलविण्यात आले होते. अंबाजोगाईत उपचार घेणाऱ्या शंतनू कांचन सोनवणे याचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला, तर लातूरला उपचार घेणाऱ्या स्वप्निलचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.

चौघेही वर्गमित्र
पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथील इयत्ता नववीतील हे चारही विद्यार्थी सकाळी १०.३० च्या सुमारास दुचाकीवरून कानसूर फाटा येथील हायस्कूलमध्ये ध्वजारोहणासाठी निघाले होते. डाकूपिंप्री ते कानसूर फाटा येथून जाताना शाळेच्या अगदी जवळ काही अंतरावर दुचाकीवरून ते मोबाइलमध्ये व्हिडीओ रिल बनवत होते. त्यांचा व्हिडीओ मोबाइलमध्ये कैद झाला. मात्र, काही वेळात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर अपघात झाला.

घटनास्थळी विदारक चित्र
घटनास्थळावरील चित्र अतिशय विदारक होते. एका विद्यार्थ्याचा हात अक्षरशः रस्त्यावर तुटून पडला होता. घटनेचे वृत्त येऊन धडकताच डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली.

Accident Two Wheeler Reel 2 Student Death 2 Injured

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेअर बाजारात हाहाकार! अदानी समुहामुळे गुंतवणूकदारांचे १०.७३ लाख कोटी बुडाले; ‘सेबी’ने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

शिंदे गटाची धाकधुक वाढली! या सर्व्हे रिपोर्टमधून अनेक बाबींचा खुलासा; आता काय होणार?

India Darpan

Next Post
Shinde Thackeray

शिंदे गटाची धाकधुक वाढली! या सर्व्हे रिपोर्टमधून अनेक बाबींचा खुलासा; आता काय होणार?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011