गोंदिया (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रायपूरहून नागपूरला जाणारी पॅसेंजर ट्रेन गोंदिया शहराजवळ मालगाडीला धडकली. आज पहाटे हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे तीन बोगी रुळावरून घसरल्या. या रेल्वे अपघातात ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. तर १३ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, भगत की कोठी ही पॅसेंजर रेल्वे रायपूरहून नागपूरच्या दिशेने निघाली होती. त्यानंतर मालगाडी आणि प्रवासी समोरासमोर आले. सिग्नल दिसत नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही. जखमींना जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेल्वेने दखल घेत या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1559727921970835456?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1559727921970835456%7Ctwgr%5E63dc2a035c8f7e1730b0d7f2639837c3da44e77b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fmaharashtra%2Fstory-passenger-train-collides-with-goods-train-in-gondia-more-than-50-injured-in-accident-10-in-critical-condition-6946934.html
Accident Passenger Train Collide with Goods Train