नाशिक – गोंदे दुमाला येथून अस्वलीकडे जाणाऱ्या एका मोटार सायकलस्वाराचा कुऱ्हेगाव जवळील तीव्र वळणावर अपघात झाला. ह्यामध्ये २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी पोहोचून मदतकार्य केले. मात्र संबंधित युवकाची प्राणज्योत मालवली.
अधिक माहिती अशी की, भरत गणेश माथे वय २२ रा. अस्वली स्टेशन हा युवराज मोटारसायकल क्रमांक एमएच १५ एचई ८३९१ घेऊन गोंदे दुमाला येथून ९ च्या सुमारास अस्वली स्टेशनकडे निघाला. कुऱ्हेगाव जवळ वारूळ म्हटल्या जाणाऱ्या भागातील तीव्र वळणावर त्याची मोटारसायकल घसरली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. स्थानिक ग्रामस्थांनी नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती कळवली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. मात्र रक्तश्राव जास्त झालेला असल्याने युवकाने प्राण सोडला. वाडीवऱ्हे पोलिसांकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून तपासकार्य सुरू करण्यात आला आहे.