नाशिक – नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जात असताना टाटा मांझा कार क्रमांक एमएच -०४ – ईएच – ६४२६ च्या चालकाच्या ओव्हरस्पीडमुळे कार वरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. त्यामुळे कार दुभाजक ओलांडून मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जात असलेल्या ट्रक वर जाऊन आदळली. यात चालक महिला गंभीर जखमी झाली असून ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गाचे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
दुसऱ्या अपघातात आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जात असताना मोटर सायकल क्रमांक एमएच -३१ एफएन ६०५८ ला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात मोटार सायकलस्वार सुनीलकुमार महानंद वय ५० रा. हैद्राबाद हा इसम गंभीर जखमी झाला. त्यास जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील उपचारासाठी नासिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचला.