झोपेत अंगावरून ट्रक गेल्याने एकाचा मृत्यू
नाशिकः मुंबई आग्रा महामार्गवरील द्वारका येथील उड्डाणपुलाखाली पिलरच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून भरधाव ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार केशव आडके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार द्वारका येथील उड्डाणपुलाच्या पिलरजवळ एक ५० वर्षीय व्यक्ती झोपला होता. रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव आलेल्या अज्ञात ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
….