चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चांदवड तालुक्यातील धोंडबे शिवारात २२ वर्षीय हायवा चालवतांना इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. झारखंड राज्यातील अजितकुमार परशुराम महतो हे मृत तरुणाचे नाव आहे. हल्ली तो चांदवड तालुक्यातील धोंडबे येथे राहत होता.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी हायवा ट्रक क्रमांक एमएच १५ जे. डब्लयु JW २९४५ मागील हायड्रोलीक ट्रॉलीवर असलेल्या इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागुन हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना भोये यांनी मयत घोषीत केले.
वडनेरभैरव पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती पोलीस पाटील गंगाधर त्र्यंबक उशीर धोंडबे यांनी दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण हे करीत आहेत.