नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यात दुचाकीस्वार २२ वर्षीय तरूणासह ८९ वर्षीय पादचारी वृध्दाचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव व पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम रविंद्र महाले (२२ रा.अंतरवेली ता.निफाड) हा युवक गेल्या सोमवारी (दि.१८) दुपारी आपल्या एमएच १५ एचएल १३७० या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. महामार्गाने ओझरकडून नाशिकच्या दिशेने तो जात असतांना हॉटेल शेरे पंजाब समोर पाठीमागून भरधाव येणाºया इर्टीगा एमएच ०१ सीआर ४८०२ या कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात महाले गभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचे काका प्रदिप महाले यानी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.
दुसरा अपघात मखमलाबाद रोडवरील ड्रीम क्रीस्टल सिग्नल भागात झाला. महाजन जगना शहा (रा.क्रांतीनगर,पंचवटी) हे वृध्द गुरूवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास सिग्नल परिसरातून रस्त्याने पायी जात असतांना अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शहा यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार सचिन अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.