गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अपघाताची मालिका सुरुच…वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2024 | 4:21 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. त्यात एका दुचाकीस्वारासह दोन पादचारींचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड इंदिरानगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोदी करण्यात आल्या आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक भिमराव पवार (२७ रा.खुंडेवाडी ता.देवळा) हा युवक गुरूवारी (दि.१४) रात्री मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करीत असताां पाथर्डी फाटा परिसरातील ताज हॉटेल समोरील उड्डाणपूलावर दुचाकी अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. भाऊ रविराज पवार याने त्यास तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता शनिवारी (दि.१६) उपचार सुरू असतांना डॉ.राधिका वरमवार यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

दुसरा अपघात याच परिसरातील वडनेर पाथर्डी मार्गावर झाला. साहेबराव रंगनाथ जाधव (५३ रा.कपील वस्ती पाथर्डी गाव) हे शुक्रवारी (दि.१५) सेल पेट्रोल पंपाजवळील यश मेडिकल समोरून आपल्या घराकडे पायी जात असतांना त्यांना भरधाव अ‍ॅटोरिक्षाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने मुलगा कृष्णा जाधव यांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

तिसरा अपघात नाशिकरोड भागात झाला. अजय हिरासिंग पाल (२४ रा.चाकण,पुणे) हा युवक शुक्रवारी नाशिकरोड परिसरातील स्फृती हॉटेल समोरून पायी जात असतांना अज्ञात चारचाकीने त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने मित्र वेलव प्रितसिंग याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता दुसºया दिवशी शनिवारी उपचार सुरू असताना डॉ. शेवंता नलवडे यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आप’ला निवडणुकीपूर्वीच मोठा झटका…या मोठया नेत्याने मंत्रिपदाचा राजीनामा देऊन केला पक्षत्याग

Next Post

मनमाडला घराघरात समीर भुजबळांच्या वचननाम्याचे वाटप…डॉ. शेफाली भुजबळ यांनी घेतल्या मतदारांच्या भेटी

Next Post
IMG 20241117 WA0356 2

मनमाडला घराघरात समीर भुजबळांच्या वचननाम्याचे वाटप…डॉ. शेफाली भुजबळ यांनी घेतल्या मतदारांच्या भेटी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011