नाशिक – रासबिहारी-मेरी रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या विचित्र अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. भरधाव येणारी पिकअप दोन धावत्या कारवर आदळल्यामुळे हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणा-या मालवाहू पिकअपच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. या अपघातात ही पीक अप सुध्दा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यानंतर या गाडीच्या वाहनचालकाला स्थानिकांनी मदत करुन बाहेर काढले. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.