नाशिक – पंचवटीत हनुमाननगर भागात दुचाकीशी जोरदार धडक झाल्याने एकाचा मृत्यु
नाशिक – घरी येत असतांना समोरुन आलेल्या दुचाकीशी जोरदार धडक झाल्याने एकाचा यांचा मृत्यु झाला. पंचवटीत हनुमाननगर भागात ही घटना घडली. सचिन नाना पाटील (वय ४५, हनुमाननगर पंचवटी) हे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी किरणकुमार नाना पाटील यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन पाटील हे त्यांच्या सुझुकी (एमएच १५ डीपी ८९१४) गाडीवरुन घरी येत असतांना समोरुन आलेल्या दुचाकीशी जोरदार धडक झाल्याने सचिन पाटील यांचा मृत्यु झाला.
नाशिक – अंबड लिंक रोड परिसरात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु
नाशिक – दुचाकीच्या धडकेत अंबड लिंक रोड परिसरात एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली. धर्मेंद्र रामकृपाल यादव (वय २१, वास्तव कंपनीजवळ शिवाजीनगर सातपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत अंबड लिंक रोडने तिडके पेट्रोल पंपासमोरुन जात असतांना अज्ञात दुचाकीच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. रविवारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. राम पाटील यांनी मृत घोषीत केले. या अपघाताची सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.