नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत कारमधील चार मित्र जखमी झाले. हा अपघात महामार्गावरील जुना जकात नाका भागात झाला. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आपल्या वाहानासह पसार झालेल्या ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद सुनिल कदम,सागर दिलीप अंबरपुरे (दोघे रा.भगवतीनगर,हिरावाडी),संकेत संजय निकम (रा.सिध्देश्वर नगर,हिरावाडी) व रौनक संजय जाधव (रा.गंगापूरगाव) अशी जखमी मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी हर्षद कदम या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. चौघे मित्र रविवारी (दि.२६) रात्री एमएच १५ एचजी ७०७५ या कारमधून नाशिककडून जुना जकात नाक्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. महामार्गावरील महाराष्ट्र दरबार या हॉटेल समोर पाठीमाहून भरधाव आलेल्या अज्ञात मालट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात चौघे मित्र जखमी झाले असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.